अहमदनगर : ‘केंद्र सरकारने ८ जूनपासून देशातील सर्व धार्मिक स्थळे नियमानुसार सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार, देशभरातील अनेक मंदिरे उघडण्यात आली आहेत. मंदिरांमध्ये वृद्ध आणि लहान मुलांना प्रवेश दिला जाणार नाही. तसेच मंदिरात जास्त गर्दी होऊ नये म्हणून, मोजक्याच भक्तांना दर्शनासाठी सोडण्यात येणार आहे.
कोरोनाचे चुकीचे रिपोर्ट देणाऱ्या लॅबला मनसेने दाखविला इंगा
एका बाजूला तिरुपती बालाजी सारखी देवस्थाने भक्तांसाठी खुली झाली आहेत तर महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या पाहता महाराष्ट्रात राज्य सरकारने धार्मिक स्थळे बंद ठेवण्याचा आदेश काढला आहे.मात्र आता हाच मुद्दा वादाचा ठरण्याची शक्यता आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील असलेल्या साईबाबा मंदिर तसेच शनी शिंगणापूर येथील शनी मंदिरासह जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील सर्व मंदिरे खुले करण्याची मागणी अहमदनगर मंदिर बचाव कृती समिती, पंडित दिनदयाळ संस्था आणि विश्व हिंदू परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे.टाईम्स नाऊ मराठीने या संदर्भात वृत्त दिले आहे.
परप्रांतियांची एंट्री आणि एक्झिट यावर राज्य सरकार घेणार ऐतिहासिक निर्णय?
मंदिरे खुले करण्याची परवानगी देण्यात यावी अन्यथा येत्या आठ दिवसात प्रत्येक मंदिरामध्येच होम हवन करून आंदोलन करण्यात येईल.’ असा इशाराच या समित्यांनी सरकारला दिला आहे. ‘देवी-देवतांवर असलेल्या श्रद्धेमुळे तसेच प्रार्थनेमुळे येणारं संकट नक्कीच कमी होईल. इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्रात देखील सरकारने केंद्र सरकारच्या नियमांचे पालन करून महाराष्ट्रात मंदिरे सुरु करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

