नवी मुंबई : आधी भारतातील एकूण कोरोनाग्रस्त रुग्णसंख्येने चीनमधील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीला पिछाडीवर सोडलं होतं. आता एकट्या महाराष्ट्र राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा चीनमधील रुग्णसंख्येपेक्षा अधिक झाल्याने चिंता वाढली आहे अश्या कठीण परिस्थितीत चुकीचे रिपोर्ट मिळाल्याने अनेक मंडळी चिंताग्रस्त होते.
अरविंद केजारीवालांची तब्ब्येत अचानक बिघडली, कोरोनाची टेस्ट होणार
अश्याच पद्धतीने चुकीचे रिपोर्ट देणाऱ्या थायरोकेयर या लॅबविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलन केलं. या लॅबमधून कोरोनाचे खोटे रिपोर्ट येत असल्याच्या तक्रारीनंतर मनसेने ही लॅब बंद पाडली. मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्त्वात हे आंदोलन करण्यात आलं.
ठाण्यात कोव्हीड-१९चे स्वॅब तपासणी करण्यास २२ मे पासून बंदी घालण्यात आली होती. असमाधानकारक कोविड चाचणी सुविधेबद्दल महापालिकेने हा निर्णय घेतला होता.थायरोकेअर लॅबमधून ठाण्यात कोव्हीड 19 चे स्वॅब तपासणी करण्यास २२ मे पासून बंदी घालण्यात आली होती.
असमाधानकारक कोविड चाचणी सुविधेबद्दल महापालिकेने हा निर्णय घेतला होता. थायोरोकेअर लॅब या आयसीएमआरच्या अधिकृत प्रयोगशाळेत कोव्हीड 19 च्यास्वब तपासणीत 6 प्रकरणात चुकीचा अहवाल आढळल्याने या लॅबला ठाण्यात कोव्हीड 19 चे स्वॅब तपासणी करण्यास बंदी घालण्याचा आदेश महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी २२ मे रोजी दिले होते.
ठाणे शहरात कोरोना कोव्हीड – १९ची प्राथमिकलक्षणे आढळणाऱ्या संशयित रुग्णांची कोव्हीड – १९ ची तपासणी शासनमान्य प्रयोगशाळेकडेच करण्यात येते. थायोरोकेअर लॅब आयसीएमआरच्या अधिकृत प्रयोगशाळेच्या यादीमध्ये घोषित करण्यात आली होती.परंतु ठाणे महानगरपालिका क्षेत्रात सदरप्रयोगशाळेने दिलेल्या 6 प्रकरणांमध्ये चुकीचा अहवाल असल्याचे आढळून आले. यामुळे अनेक रूग्णांना सामाजिक आणि मानसिक त्रासातून जावे लागले होते.
सचिनला बाद केल्यानंतर आले धमक्यांचे कॉल, गोलंदाजाच्या दाव्याने खळबळ
२२ मे २०२० पासून ठाणे महानगरपालिकाक्षेत्रातील संशयितांसाठी कोविड -19 स्वॅबगोळा करू नये असे आदेश ठाणे महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी दिले होते.परंतु आज पुन्हा एका नामांकित वेबसाईट ची २२ मे ची बातमी सर्वत्र व्हायरल झाल्याने मनसेचे अविनाश जाधव यांनी या लॅब मार्फत होणाऱ्या फक्त कोरोना टेस्ट नाही तर सर्वच टेस्ट बंद व्हाव्या यासाठी ठाण्यात असणाऱ्या या लॅब बाबत शोध सुरू केला. पण ही लॅब ठाण्यात नसून तिचे फक्त कलेक्शन सेंटर ठाण्यात आहेत. या लॅबचे हेड ऑफिस नवी मुंबईत आहे ही माहिती समजल्यावर अविनाश जाधव यांनी त्यांच्या नवी मुंबई येथील सहकार्यांसोबत या लॅबवर धडक दिली आणि तुम्ही करत असलेल्या सर्व टेस्ट बंद करा.. तुमच्या मुळे नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे तुमची लॅब बंद करा असा इशारा अविनाश जाधव यांनी लॅब ला दिला.
ठाणे महापालिका क्षेत्रात ही लॅब २२ मे पासून कोरोना टेस्ट करत नाही तर पनवेल महानगरपालिका क्षेत्रातही या लॅबच्या टेस्ट बंद आहेत पण मुंबई महानगरपालिका यांच्याकडून टेस्ट करवून घेते ही धक्कादायक बाब अविनाश जाधव यांनी जेव्हा या लॅबवर धडक दिली तेव्हा समोर आली.आता ही लॅब कुठेही टेस्ट करणार नाही असे अविनाश जाधव यांनी सांगितले.
आजपासून देश अनलॉक, याअनलॉकमध्ये पुण्यातील लॉकडाऊनसंदर्भात आहेत ‘हे’ नवीन आदेश
दरम्यान, राज्यातील मुंबई,पुणे,औरंगाबाद,सोलापूर,जळगाव ही शहरे कोरोना व्हायरसची हॉटस्पॉट बनली आहेत. या शहरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून हा सर्वांच्याच चिंतेचा विषय झाला आहे. यातच आता राज्य सरकारने पुनश्च हरिओम म्हणत लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिली आहे यामुळे आणखी रुग्ण वाढणार असल्याची शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

