Share

‘नानक-नामदेव एक्सप्रेस’ नावाने रेल्वे सुरु करा – भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: ‘संत नामदेव’ यांनी भागवत धर्म आणि वारकरी संप्रदायाची पताका सर्वदूर फडकवली. यासाठी ते पंजाबातील घुमानला पोहचले होते. तर हे वर्ष संत नामदेवांचे हे ७५० वे जयंती वर्ष आहे. या पार्श्वभूमीवर संतांचे चरित्र लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले जात असतात. अशीच एक मागणी भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.

संत नामदेवांचे भागवत धर्माचे प्रचारकार्य महाराष्ट्रापुरते मर्यादित नव्हते तर नामदेवांनी पंजाबमध्ये जाऊन वारकरी परंपरेचा प्राचार केला. त्यामुळे नामदेवांच्या काही रचना शीख धर्मग्रंथ ‘गुरुग्रंथसाहिब’ यामध्ये देखील आढळून येतात्त. तर शीख धर्म संस्थापक गुरु नानक देव जी संत नामदेवांचा खूप आदर करीत होते.

त्याच बरोबर गुरु नानक देव जी यांचे सुद्धा हे ५५१ वे प्रकाश पर्व सुरु आहे. त्यामुळे या दोन संतांच्या सन्मानार्थ केंद्र सरकारने महाराष्ट्र ते पंजाब एक नवी रेल्वेगाडी सुरु करुन तीला नानक-नामदेव एक्सप्रेस असे नाव द्यावे अशी मागणी भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.

भाजपच्या आध्यात्मिक समन्वय आघाडी चे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी भारताचे रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना यासंदर्भात एक पत्र पाठवले आहे.नुकतेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात दि. १५ डिसेंबर २०२० रोजी राज्य सरकारला संत नामदेवांचे ७५० वे जयंती वर्ष साजरे करणे बाबत सुचना केली होती. याबद्दल त्यांचे समस्त वारकरी संप्रदाय व अ.भा.शिंपी समाजातर्फे आभार मानन्यात आले होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!