Share

सौरव गांगुलीला हॉस्पिटलमधून मिळाला डिस्चार्ज

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भारताचा माजी कर्णधार आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) सध्याचा अध्यक्ष सौरव गांगुलीला गुरुवारी (७ जानेवारी) हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आले आहे. त्याला काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा सौम्य झटका आला होता.

त्यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. बीसीसीआयचा अध्यक्ष गांगुलीने हॉस्पिटलमधून घरी परताना म्हटले आहे की ‘मी डॉक्टरांचे आणि उपचारासाठी हॉस्पिटलचे आभार मानतो. मी ठिक आहे.’

दरम्यान, सौरव गांगुली याला शनिवारी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. गुलीला उपचारांसाठी कोलकातामधील वुडलॅंड्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गांगुलीला जीममध्ये वर्कआऊट करताना त्रास जाणवू लागला. यानंतर गांगुलीने वुडलॅंड्स रुग्णालयात तपासणी करुन घेतली. तपासणीत छातीत गंभीर त्रास असल्याचं निदान झालं.यानंतर सौरव गांगुलीवर अँजिओप्लास्टी करण्यात आली. ती यशस्वी झाली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!