औरंगाबाद : १५ डिसेंबरनंतर लसीचा एकही डोस न घेतलेले नागरी आढळल्यास मनपाच्या नागरी मित्र पथकाद्वारे ५०० रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय(Astik kumar pandey) यांनी याबाबत आज आदेश काढले आहेत.
जिल्ह्यातील लसीकरणाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी नागरिकांना लसीकरणाची सक्ती केली आहे. ज्या लोकांनी अद्याप दुसरा डोस घेतलेला नाही, त्यांनी १५ डिसेंबरपर्यंत दुसरा डोस घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच पात्र असूनही लस घेण्यास दिरंगाई करताना आढळल्यास अशा नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. ज्या नागरिकांनी पहिला डोस घेऊन ८५ दिवस पूर्ण केले आहेत. मात्र दुसरा डोस घेणे बाकी आहे, अशा नागरिकांना दर १५ दिवसांनी ५०० रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.
येत्या बुधवारपासून म्हणजेच १५ डिसेंबरपासून या करावाईला सुरुवात होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड जिल्हास्तरीय टास्क फोर्सची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत पण लसीकरण पूर्ण झालेल्या नागरिकांना कडक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार महानगरपालिकेच्या नागरी मित्र पथकाला दंड वसूल करण्याचा अधिकार मनपा प्रशासनातर्फे देण्यात आला आहे. या दंडाची ५० टक्के रक्कम पोलीस प्रशासनाला तर ५० टक्के रक्कम मनपा प्रशासनाकडे जमा करण्यात येणार आहे.
मास्क सक्तीसाठी नागरी मित्र पथकाची स्थापना
कोरोना संसर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी सुरुवातीपासून शहरातील विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येत आहे. तसेच या सोबतच रस्त्यावर थुंकणे, रस्त्यावर कचरा टाकणे यासाठी दंड आकारण्यात येत आहे. यासाठी नागरी मित्र पथकाची मनपाने नियुक्ती केली आहे. मात्र सुरुवातीपासूनच नागरी मित्र पथक वादाच्या भोवर्यात सापडले आहे. यामध्ये मनमानी पद्धतीने केला जाणारा कारभार, सक्तीने वसुली यांसारख्या अनेक तक्रारी नागरिकांमधून आलेल्या आहेत.
पर्वापासून आम्ही कारवाई सुरु करणार
शहरात याआधी जे पथक मास्क सक्ती, सोशल डिस्टन्सिंग, उघड्यावर कचरा टाकणे, प्रतिबंधित प्लास्टिकबाबत कारवाई करत होते. तेच पथक लसीकरणाबाबत ही कारवाई करणार आहे. पर्वापासून ही कारवाई सुरू होईल. यामध्ये १५ पथक आहेत. प्रत्येक पथकात दोन माजी सैनिकांचा समावेश आहे. विविध आस्थापना, कार्यालय, दुकाने, गर्दीची ठिकाणे यांसारख्या भागांमध्ये जाऊन नागरिकांनी लस घेतलेली आहे किंवा नाही याबाबत हे पथक पाहणी करतील. अशी माहिती नागरी मित्र पथक प्रमुख प्रमोद जाधव यांनी दिली.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘तुला काय झालं…’ म्हणत जान्हवीच्या हाताकडे पाहून नेटकऱ्यांनी केले कमेंट
- रवीना टंडनने शेअर केलेल्या व्हिडीओची रंगली चर्चा ; वाचा काय आहे प्रकरण
- धक्कादायक ! करीना कपूर आणि अमृता अरोरा कोरोना पॉझिटिव्ह
- आम्हाला मुस्लिम आरक्षणाचे गिफ्ट द्या; आम्ही तुम्हाला निवडणूक न लढण्याचे रिटर्न गिफ्ट देऊ-खा. जलील
- अभ्यासाचा ताण असह्य झाला; ‘ती’ने अखेर मृत्यूला कवटाळले..!

