औरंगाबादः गेल्या २ वर्षांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन शिक्षण सुरु आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांवर एक प्रकारचा वेगळाच तणाव आलेला आहे. घरी राहून शिक्षण घेत असल्यामुळे कौशल्य विकासावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. वाढता ताण असह्य झाल्याने गंगापूर तालुक्यातील नववीच्या विद्यार्थिनीने राहत्या घरात गळफास घेतल्याची धक्कादायक घटना रविवारी उघडकीस आली. तनुजा उत्तम पाटेकर असे या विद्यार्थिनीचे नाव असून शिल्लेगाव पोलीस ठाण्यात याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शैक्षणिक प्रगतीत समाधानकारक कामगिरी होत नसल्यामुळे तनुजा सतत चिंतेत होती, अशी माहिती नातेवाईकांनी दिल्याचे पोलिसांच्या चौकशीतून उघड झाले आहे. खादगाव येथील उत्तम पाटेकर हे अल्पभूधारक शेतकरी असल्याने ते एका खासगी कंपनीत रोजंदारीने काम करत आपल्या कुटुंबाचा गाडा चालवतात. त्यांना चार मुली असून सर्वात मोठी मुलगी तनुजा ही इयत्ता नववीत शिक्षण घेत होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून ती अभ्यासाच्या तणावात होती.
कुटुंबियांशीही ती फार बोलत नव्हती. शनिवारी रात्री तनुजा नेहमीप्रमाणे आजी-आजोबांसोबत एका खोलीत झोपी गेली होती. रविवारी सकाळी कुटुंबातील सदस्य उठल्यानंतर मागच्या घरात गेले असता तनुजा फासावर लटकलेल्या अवस्थेत दिसून आली. त्यानंतर कुटुंबातील सदस्यांनी आरडा ओरड सुरु केली. ग्रामस्थ जमा झाले. सरपंचांना ही माहिती देण्यात आली. तनुजाला खाली काढून सिद्धनाथ वाडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले गेले. तिथे डॉक्टरांनी तिवा मृत घोषित केले. शवविच्छेदनानंतर कुटुंबियांच्या ताब्यात तिचा मृतदेह देण्यात आला.
महत्त्वाच्या बातम्या
- आगामी महापालिका निवडणुकीत सेना-राष्ट्रवादी एकत्र येणार काय? राज ठाकरे म्हणतात…
- कतरिनाच्या भावाचं ‘या’ मराठमोळया अभिनेत्रीने चोरलं काळीज
- आरटीई कायद्यात शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा समावेश करा; शिक्षक संघटनेकडून मागणी!
- आकाश चोप्राने निवडला वर्षातील सर्वोत्तम कसोटी संघ; विराट कोहलीला दिला डच्चू
- ‘तेव्हा तुमचे 2 खासदार सायकलवरुन संसदेत जात होते ते विसरलात काय?’

