Share

रवीना टंडनने शेअर केलेल्या व्हिडीओची रंगली चर्चा ; वाचा काय आहे प्रकरण

Published On: 

मुंबई : सिनेसृष्टीतील अभिनेत्री रवीना टंडन ( Raveena Tandon) ही सर्वपरिचित आहे. ती सोशल मीडियावर (social media) देखील प्रचंड सक्रिय असून पोस्टद्वारे तिचे मत बिनधास्तपणे मांडताना दिसते. नुकताच चक्क तोंडानं श्वास देत एका व्यक्तीने माकडाचे प्राण वाचविल्याने भावूक झालेल्या रवीनाने हा व्हिडिओ शेअर केला आहे. सोशल मीडियावर या व्हिडिओ जोरदार चर्चा रंगली आहे.

दरम्यान रवीनाने शेअर केलेला व्हिडीओ हा पेरम्बलूर (Perambalur) येथील आहे. या व्हिडीओमध्ये एक माकड दिसत आहे. ते माकड मृत असून एक व्यक्ती त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत असतो. ती व्यक्ती अक्षरश: त्या माकडाला तोंडाने श्वास देत वाचवण्याचा प्रयत्न करते. तोंडाने श्वास दिल्यानंतर ते माकड जिवंत होते आणि त्या व्यक्तीला मिठी मारुन बसते. हा व्हिडीओ पाहून त्या व्यक्तीचे तुम्हीही कौतुक कराल. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रवीनाने हे व्हिडीओ शेअर करत, ‘हे माणुसकीचे एक उदाहरण आहे. खूप दिवसांनंतर मी असे पाहिले आहे. मला या व्यक्तीला भेटण्याची इच्छा आहे. हा खरा सुपरहिरो. देवाच्या कृपेने तुम्ही नेहमी आनंदात रहाल’ या आशयाचे कॅप्शन रवीनाने दिले आहे.

अभिनेत्री रवीना टंडनची ‘अरण्यक’ (‘Aranyak’) ही वेब सीरिज काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाली होती. या सीरिजच्या माध्यमातून तिने डिजिटल विश्वात पदार्पण केले आहे. या सीरिजमध्ये तिने महिला पोलीस अधिकारी कस्तूरी डोगराची भूमिका साकारली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!