Share

आम्हाला मुस्लिम आरक्षणाचे गिफ्ट द्या; आम्ही तुम्हाला निवडणूक न लढण्याचे रिटर्न गिफ्ट देऊ-खा. जलील

Published On: 

औरंगाबाद : राज्य सरकारने मुस्लिम समाजाला आरक्षण दिले तर एमआयएम राज्यभरात कुठेही महापालिका निवडणूक लढवणार नाही. अशा प्रकारची खुली ऑफर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडी सरकारला औरंगाबाद येथे दिली आहे. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता ओबीसी आरक्षणाबरोबरच मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. राज्य सरकारने मुस्लिमांना आरक्षणाची ही भेट द्यावी, त्याबदल्यात निवडणुकांना न लढण्याची परत भेट आम्ही त्यांना देऊ. असे यावेळी जलील यांनी सांगितले.

नुकतेच खासदार इम्तियाज जलील यांनी मुंबईत मोठी सभा घेतल्यानंतर आज औरंगाबाद येथे स्वतंत्र पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा मुस्लिम समाजासाठी आरक्षणाची मागणी त्यांनी केली आहे. यासाठी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये त्यांनी अल्पसंख्यांक व मुस्लीम समाजाला आरक्षण देण्यात यावे अशी मागणी केलेली आहे. त्याच बरोबर राज्यातील मालमत्तेच्या संरक्षणाबाबत ही त्यांनी यामध्ये लिहिले आहे.

मुस्लिम समाजाला त्वरित ५ टक्के आरक्षण त्याप्रमाणे मराठा आरक्षणाच्या धर्तीवर मुस्लिम समाजातील सुशिक्षित बेरोजगारांना नोकरी, मुस्लिम समाजाच्या विकासासाठी शंभर कोटींची तरतूद व वक्फ मंडळासाठी पाचशे कोटी रुपयांची तरतूद या मुख्य आठ मागण्या त्यांनी केल्या आहेत. त्याचबरोबर आरक्षणाचा आणि राजकारणाचा संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले. मुस्लिमांना आरक्षण मिळायलाच हवे, निवडणुका जिंकण्यासाठी एमआयएमचा हा फंडा नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे मुंबई येथे काढलेली तिरंगा रॅली आरक्षणासाठीची सुरुवात होती. अभी आगे आगे देखो होता है क्या, असा इशाराच त्यांनी राज्य सरकारला दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!