मुंबई : देशभरात पुन्हा एकदा कोरोनाची दहशत पाहायला मिळत आहे. काही काळापूर्वी अभिनेता कमल हासन कोरोना पॉझिटिव्ह असल्याची बातमी समोर आली होती. आता बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor Khan) आणि अमृता अरोरा (Amrita Arora) यांचीही करोना चाचणी पॉझिटिव्ह (Corona Positive)आली आहे. विशेष म्हणजे मागच्या काही दिवसांमध्ये करीना आणि अमृतानं अनेक पार्ट्यांना हजेरी लावली असल्यांनं त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांच्याच सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
दरम्यान दोन दिवसांपूर्वी करीना कपूरने बहीण करिश्मा कपूरसोबत करण जोहरच्या पार्टीला हजेरी लावली होती. तसेच करीना कपूर आणि अमृता अरोरा यांना करोनाची लागण झाली असल्याच्या संदर्भात एएनआयनं ट्वीट (ANI) केलं आहे. या दोघींनीही कोणत्याही करोना नियमांचं पालन न करताच अनेक पार्ट्यांना हजेरी लावल्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना आरटीपीसीआर चाचणी (RTPCR) करून घेण्याचे आदेश मुंबई महानगरपालिकेनं दिले आहेत. करोना नियमांचं उल्लंघन करून बॉलिवूड पार्ट्यांमध्ये उपस्थित राहिल्यामुळेच करीना आणि अमृता यांना करोनाची लागण झाल्याचं बोललं जात आहे.
Actors Kareena Kapoor Khan & Amrita Arora tested positive for #COVID19. Both of them had violated COVID norms & attended several parties. BMC has ordered people, who came in contact with the two actors, to undergo RT-PCR test: BMC (Brihanmumbai Municipal Corporation)
(File pic) pic.twitter.com/wKqoqgFM4x
— ANI (@ANI) December 13, 2021
करीनाच्या तब्येतीबाबत अपडेट देतांना करीना कपूरचे वडील रणधीर कपूर ( Randhir Kapoor) म्हणाले की, काल करीना कोराना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले. त्याला अत्यंत किरकोळ लक्षण असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. त्यांची मुले त्यांच्यासोबत असून ते सध्या कॉरंटाईनमध्ये आहेत. मुंबई महानगर पालिकेच्या (Mumbai Municipal Corporation (MMC) सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या दोन्ही अभिनेत्रींमुळे अनेकांना करोनाचा संसर्ग झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. करीना कपूर आणि तिची मैत्रिण अभिनेत्री अमृता अरोरा यांची कोविड-19 चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. या दोघांनी अद्याप या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. तसेच काही दिवसांपूर्वीच या दोघीही त्यांच्या गर्ल्स गँगसोबत पार्टी करताना दिसल्या होत्या. ही पार्टी अनिल कपूर यांची मुलगी रिया कपूरच्या घरी देण्यात आली होती आणि त्यात मलायका अरोरा, करिश्मा कपूर या देखील सहभागी झाल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या
- आगामी महापालिका निवडणुकीत सेना-राष्ट्रवादी एकत्र येणार काय? राज ठाकरे म्हणतात…
- कतरिनाच्या भावाचं ‘या’ मराठमोळया अभिनेत्रीने चोरलं काळीज
- आरटीई कायद्यात शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा समावेश करा; शिक्षक संघटनेकडून मागणी!
- आकाश चोप्राने निवडला वर्षातील सर्वोत्तम कसोटी संघ; विराट कोहलीला दिला डच्चू
- ‘तेव्हा तुमचे 2 खासदार सायकलवरुन संसदेत जात होते ते विसरलात काय?’

