Share

विजांच्या कडकडाटात पावसाने शहराला धुतले; सखल भागात साचले पाण्याचे तळे

Published On: 

औरंंगाबाद : शहर आणि परिसरात रविवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. दिवसभर कडक ऊन आणि कमालीचा उकाडा जाणवत असताना रविवारी (दि.६) सायंकाळी आकाशात काळे ढग दाटून आले. अन् काही वेळातच वातावरण पालटून विजांच्या कडकडाटात जोरदार पावसाला सुरुवात झाली. वीस मिनिटानंतर पावसाचा जोर चांगलाच वाढला होता. ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटात पावसाने जवळपास तासभर शहराला धुवून काढले. जोरदार पावसामुळे शहराच्या विविध भागातून वाहणाऱ्या नाल्यांना पूर आला होता. तर सखल भागात पावसाच्या पाण्याचे तळे साचले होते.

गेल्या सात ते आठ दिवसांपासून  औरंगाबाद शहर परिसरात एकसारखा पाऊस पडत आहे. केरळात मान्सून दाखल झाला असला तरी अद्याप आपल्याकडे पोहोचायला त्याला विलंब लागणार आहे. रविवारी दिवसभर आकाशात उन्हाचा आणि काळ्या ढगांचा लपंडाव सुरू होता. दुपारी दोन वाजेच्या सुमारास पावसाने शहर परिसरात हजेरी लावली होती. त्यानंतर कडक उन्ह पडले होते. सायंकाळच्या वेळी पाच वाजेनंतर शहरावर पुन्हा काळ्याकुट्ट ढगांनी गर्दी करण्यास सुरूवात केली. सायंकाळी सात वाजेच्या सुमारास विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटात पावसाला सुरूवात झाली. जवळपास तासभर कोसळत असलेल्या पावसाने अनेकांची चांगलिच फजिती केली होती.

अनेकांनी नाल्यावर अतिक्रमण करून अपार्टमेंट उभारल्यामुळे आजूबाजूच्या घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली होती. तर पावसात वाहने बंद पडल्याने गुडघाभर साचलेल्या पाण्यातून वाहने ढकलतांना वाहनधारकांची त्रेधातिरपीट उडाली होती. मनपाच्या वतीने पावसाळ्यापूर्वीची कामे झाली असल्याचा दावा करण्यात आला असला तरी पहिल्याच पावसात त्याचे पितळ उघडे पडले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!