🕒 1 min read
मुंबई : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा कोरोना परिस्थिती बघता ऑनलाइन घ्याव्यात अथवा काही काळासाठी स्थगित कराव्यात अशी मागणी करण्यात येत होती. मात्र, या परीक्षा ऑफलाईन घ्याव्या लागणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, विद्यार्थ्यांची काळजी घेण्याची ग्वाही देखील त्यांनी दिली आहे.
या संदर्भात मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनीही मागणी केली होती. त्यावर देशमुख यांनी प्रत्त्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की, ‘महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईन घेण्याबाबत केंद्रीय कौन्सिल ने परवानगी दिलेली नाही. तसेच विद्यापीठाच्या परीक्षा धोरणाशी हे सुसंगत नाही. मा. उच्च न्यायालय मुंबई यांनी यापूर्वीच या संदर्भातील याचिका फेटाळली आहे. यामुळे ऑफलाईन परीक्षा घेणे अनिवार्य आहे. परीक्षा कालावधीत सर्व विद्यार्थ्यांच्या कोवीड सुरक्षेची काळजी घेण्याची ग्वाही विद्यापीठ देत आहे.’
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा आॅनलाईन घेण्याबाबत केंद्रीय कौन्सिल ने परवानगी दिलेली नाही.तसेच विद्यापीठाच्या परीक्षा धोरणाशी हे सुसंगत नाही.
मा. उच्च न्यायालय मुंबई यांनी यापूर्वीच या संदर्भातील याचिका फेटाळली आहे. यामुळे आॅफलाईन परीक्षा घेणे अनिवार्य आहे. https://t.co/mnwyIe2rVN— Amit V. Deshmukh (@AmitV_Deshmukh) June 6, 2021
आगामी १० तारखेपासून या परीक्षा सुरू होणार आहेत. मात्र परीक्षांबाबत लवकर निर्णय न झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. यात काही विद्यार्थ्यांनी परीक्षा पुढे ढकलण्यास विरोध केला होता. तर काही विद्यार्थी पुढे ढकलण्याची मागणी करत होते. अखेर या परीक्षा ऑफलाईनच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मोठी बातमी : ‘कुठेही सरसकट निर्बंध शिथील करण्यात आलेले नाहीत, गर्दी होणार नाही याची काळजी घ्या ‘
- मराठा आरक्षणप्रश्नी राज्य सरकार पंतप्रधान मोदींची भेट घेणार; जयंत पाटलांच महत्वाचं विधान
- ‘संभाजीराजे आणि उदयनराजे यांच्याबद्दल आदर, आरक्षणासाठी केंद्र सरकारवर दबाव आणावा’
- ‘प्रशासन चालवताना आपण जनतेसाठी आहोत, हे लक्षात ठेवावं यासाठीच शिवस्वराज्य दिन’
- मराठा आरक्षणाबाबतच्या अजित पवारांच्या ‘त्या’ विधानात दांभिकपणा; चंद्रकांत पाटलांची टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

