Share

एसटी संप, ओबीसी आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी राज्य मंत्रीमंडळाची आज बैठक

Published On: 

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी समाजाला २७ टक्के आरक्षण देता येणार नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यानंतर आज एसटी कर्मचारी संप आणि ओबीसी आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी राज्य मंत्रीमंडळाची बैठक होणार आहे.

ओबीसी आरक्षणाला (OBC Reservation) सर्वोच्च न्यायालयाने स्थिगीती दिल्यानंतर महाविकास आघाडी सरकारवर प्रचंड टीका होत आहे. विरोधकही आक्रमक झाले आहेत. याच पार्श्वभुमीवर राज्य मंत्रिमंडळाची आज महत्वपूर्ण बैठक होणार आहे. अशातच, आरक्षण नाही, तर मतदान नाही, असा निर्धार भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील ओबीसी मतदारांनी केला आहे. त्यामुळे ओबीसी नेत्यांचे मोठे नुकसान होणार आहे. यामुळे ओबीसी नेते या बैठकीत गदारोळ घालण्याची शक्यता आहे.

यासह राज्यावर ओढावलेले ओमायक्रॉनच्या (Omaycron) संकटावरही मंत्रीमंडळ बैठकीत चर्चा होणार आहे. राज्यात ओमायक्रोनचे रुग्ण आढळल्यानंतर राज्यातील आरोग्य यंत्रणा अधिकच सतर्क झाली असून, हे संकट रोखायचे कसे आणि आणखी कशा पद्धतीच्या उपाययोजना कराव्या लागतील, यावर विस्तृत चर्चा होण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!