Share

एसटीचे दर पुन्हा वाढले

Published On: 

औरंगाबाद: पेट्रोल डिझेलच्या वाढलेल्या दरामुळे एसटी महामंडळाला मालवाहतूक करण्यासाठी तिसऱ्यांदा दरवाढ करावी लागली आहे. एसटीने शंभर किलोमीटरच्या आत असलेल्या मालवाहतुकीच्या भाड्यात चार रूपयांची दरवाढ केली आहे. प्रतिकिलोमीटर दर ४६ रूपये झाला आहे. या दरवाढीचा फटका एसटीच्या मालवाहतुकीला सोसावा लागत आहे.

लॉकडाउनमुळे एसटीतून प्रवासीसेवा बंद होती. यामुळे मालवाहतूक करण्यासाठी परिवहन विभागाने परवानगी दिली. यासाठी एसटीने जुन्या बस मालवाहतुकीसाठी तयार करून घेतल्या आहेत. ही सेवा सुरू झाल्यानंतर औरंगाबाद विभागाला मालवाहतुकीतून साधारणपणे २५ ते ३० लाखांपर्यंत उत्पन्न मिळत होते. सेवा सुरू करण्यात आली तेव्हा १०० किलोमीटरसाठी ३८ रूपये प्रति किलोमीटर दर होता. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.

यानंतर पेट्रोल आणि डिझेलचे दरवाढ होत राहिल्याने, महामंडळाने १०० किलोमीटरसाठी ४२ रूपये दर केला. त्यानंतरही अनेक व्यापाऱ्यांनी या सेवेचा लाभ घेतला. आता तो ४२ वरून ४६ रूपये केल्याने याचा फटका एसटीच्या मालवाहतुकीला सोसावा लागत आहे. मालवाहतुकीसाठी ऑर्डर आणणाऱ्या काही कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मालवाहतूक करण्यासाठी कंपनीसोबत वाहतूकदारांचा करार होतो. त्यात दिलेला इंधनदर भविष्यात दरवाढ अपेक्षित करून नोंदविला जातो. इंधनाचे दर जास्त असले तरीही संबंधित वाहतूकदाराला कंत्राटामध्ये नमूद दरानुसार मालवाहतूक करावी लागत आहे.

एसटीने दरवाढ जाहीर केल्याने एसटीच्या गाड्यांतून मालवाहतूक करणाऱ्या एजन्सीला पुन्हा नवीन दर द्यावा लागत आहे. वारंवार होत असलेल्या या दरवाढीमुळे संबंधित एजन्सीही एसटीला मालवाहतूक करण्याचा कंत्राट देण्यास कुचराई करीत आहे. या दरवाढीमुळे गेल्या महिन्यात औरंगाबाद विभागाचे मालवाहतुकीतून उत्पन्न १८ लाखपर्यंत झाले आहे. या दरवाढीचा फटका एसटीला सोसावा लागत आहे.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!