Share

भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वी श्रीलंकेचा ‘हा’ प्रमुख खेळाडू दुखापतग्रस्त

Published On: 

मुंबई : भारतीय संघाचा श्रीलंका दौरा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ५ दिवस पुढे ढकलण्यात आला. येत्या १८ जुलै पासुन श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालकिेला सुरुवात होईल. टीम इंडियाचे प्रमुख खेळाडू इंग्लंडमध्ये असल्याने या दौऱ्यावर संघाचे नेतृत्व शिखर धवन करत आहे.

भारताविरुद्धच्या या मालिकेपुर्वी श्रीलंका संघासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. श्रीलंका संघाचा कर्णधार आणि प्रमुख फलंदाज कुशल परेरा हा सरावादरम्यान दुखापतग्रस्त झाला आहे. दुखापतीमुळे भारताविरुद्धच्या मालिकेत परेराचं खेळण अनिश्चीत मानलं जात आहे. परेराची काही दिवसापुर्वीच श्रीलंकेच्या टी-२० आणि एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली होती. मात्र भारताविरुद्ध जर तो खेळला नाही तर संघाचे नेतृत्व दासून शनाकाची कर्णधारपदी नियुक्ती होऊ शकते.

भारतीय संघाचा श्रीलंका दौरा सुरुवातीपासूनच चर्चेचा ठरला आहे. सुरुवातीला माजी खेळाडू अर्जुना रणतुंगाने बीसीसीआयवर दुय्यम संघ पाठवला म्हणून टिका केली होती. यानंतर इंग्लंडवरुन परतल्यानंतर संघाचे फलंदाजी प्रशिक्षक ग्रँट फ्लॉवर यांना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे भारताविरुद्धच्या मालिकेसाठी नवीन संघाची बांधणी करण्यात आली. यामुळे मालिका पाच दिवसासाठी पुढे ढकलण्यात आली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!