मुंबई : ‘आमच्या सरकारने विकासाचे राजकारण केले. मात्र हे सरकार स्थगितीचे राजकारण करत आहे. त्यावेळी आमच्याकडून झालेल्या चुकीचा इतका मोठा फायदा घेवू नका,’ असं भाजप नेते व माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
ते गुरुवारी अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान बोलत होते. गुरुवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पावरील चर्चेला सुरुवात केली. तसेच यावेळी ते म्हणाले, ‘शिवसेनेबरोबरची आमची मैत्री ३० वर्षाची आहे. तर तुमच्या मैत्रीला अजून तीस महिनेही झाले नाहीत, असा टोला त्यांनी लगावला.
पुढे बोलताना ते म्हणाले, ‘आमच्याकडून त्यावेळी झालेल्या चुकीचा इतका मोठा फायदा घेवू नका. कदाचित उद्या तुमच्यातलाच एखादा ज्योतिरादित्य सिंधिया आमच्या सोबत येईल आणि आमचे सरकार पुन्हा येईल. त्यावेळी आम्ही स्थगितीचे नव्हे तर विकासाचे सरकार आणू, असा विश्वास मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
दरम्यान, ‘कारागृहात एका कैद्यासाठी ८८ रूपयांचा खर्च येतो. गुन्हेगार असूनही त्याला सन्मानाची वागणूक मिळते तर दुसरीकडे जनतेला १० रूपयांची थाळी देवून त्यांची चेष्टा करत आहात का ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
