Share

मॉडेलिंग ते अध्यात्मिक गुरु; भय्यूजी महाराज यांचा थक्क करणारा जीवनप्रवास

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा: राजकारण असो कि बॉलीवूड प्रत्येक क्षेत्रात भय्यूजी महाराज यांना मानणारी व्यक्तींची संख्या मोठी आहे. भय्यूजी महाराजांचं नाव डॉ. उदयसिंह देशमुख असून, त्यांचा जन्म 29 एप्रिल 1968 मध्ये मध्यप्रदेशातील सृजलपूरमध्ये झाला त्यांनी वयाच्या 20 व्या वर्षी मॉडेलिंगला सुरुवात केली. ते एक यशस्वी मॉडेल्स होते. सियाराम सारख्या जगविख्यात ब्रांडसाठी त्यांनी मॉडेलिंग केले होते.

पुढे वयाच्या २२ व्या वर्षी त्यांना अध्यात्मिक साक्षात्कार झाल्याच बोलल जात. तेथून त्यांनी आध्यात्माकडे झोकून देत 1996 मध्ये त्यांनी सूर्योदय परिवार आणि आश्रमाची स्थापना केली. भक्ती – शक्तीचा अंतर्भाव असणारे भय्यूजी महाराज यांनी आध्यात्मातुना सामाजिक उन्नतीसाठी मोठे काम उभे केले होते. आपल्या सूर्योदय परिवाराच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवले. त्यामध्ये अनेक रुग्णांसाठी विशेष काम, भारतभरात 11,11,111 झाडं लावण्याचा संकल्प, अनाथ मुलांसाठी कार्य अशा अनेक सामाजिक कार्यामध्ये त्यांचा सहभाग होता.

अनेक मोठ्या राजकीय नेत्यांचे अध्यात्मिक गुरु देखील होते. अनेक वेळा राजकीय, सामाजिक, अध्यात्मिक पेच प्रसंग सोडवण्यासाठी राजकीय नेते त्यांचा सल्ला घेत. दोन वर्षांपूर्वी त्यांच्या पहिल्या पत्नीचं हृदयविकाराने निधन झालं होतं. त्यानंतर त्यांनी डॉ. आयुषी शर्मा यांच्याशी विवाह केला होता.

विलासराव देशमुख, पंतप्रधान नरेंद्र मोदी, रावसाहेब दानवे यांच्यासह अनेक बडे नेते त्यांचे शिष्य होते. तर देशातील अनेक मोठे राजकारणी, अभिनेते, गायक आणि उद्योगपती त्यांच्या आश्रमात जायचे. माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, लता मंगेशकर, आशा भोसले, अनुराधा पौडवाल तसंच अनेक सिनेकलाकार त्यांच्या आश्रमात जायचे. कपूर घराण्याशी त्यांचा खास लोभ होता.

अण्णा हजारे यांच्या लोकपालच उपोषण यशस्वीपणे सोडवण्यात त्यांनी मध्यस्थी केली होती. भय्यू महाराज यांच्या हातून ज्यूस पिऊन अण्णानी उपोषण सोडलं. गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यावर नरेंद्र मोदी सद्भवना उपोषणला बसले होते. गुजरातमधलं नरेंद्र मोदींचं सद्भवना उपोषण भय्यूजींच्या मध्यस्थीनेच सोडवण्यात आलं होतं.

गेली अनेक वर्ष सर्वच क्षेत्रावर प्रभाव असणारे भय्यूजी महाराज यांनी आज वयाच्या ४७ व्या वर्षी स्वत:वर गोळी झाडून घेत आपल जीवन संपवलं आहे. हजारो लोकांच्या मदतीला धावणारे भय्यू महाराज यांच्या अशा जाण्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. उद्या त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असून देशभरातील अनेक बडे नेते, अभिनेते, गायक आणि उद्योगपती त्यांच्या अंत्य दर्शनासाठी येणार आहेत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!