परभणी : परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक जाहीर झाली आहे. आजपासून २२ फेब्रुवारीपर्यंत नामनिर्देशन प्रक्रिया सुरु असणार आहे. २३ फ्रेब्रुवारीला अर्जांची छाननी होऊन वैध नामनिर्देशन पत्रांची यादी जाहीर करण्यात येईल. २३ फेब्रुवारी ते १० मार्च या काळात उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार आहे. त्यानंतर १२ मार्चरोजी उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात येईल आणि २१ मार्च रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. २३ फेब्रुवारीला निकाल हाती येणार आहेत. या निवडणुकीसाठीचा कार्यक्रम आज अधुकृतरित्या जाहीर करण्यात येणार आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्हाभरातील राजयकीय वर्तूळाचं लक्ष लागले होते. कोरोनामुळे बँकेची निवडणूक लाबणीवर पडली होती. मात्र, जानेवारी महिन्यात राज्य शासनाने निवडणूक प्रक्रिया राबवण्याचे आदेश दिले. त्यानंतर आता जिल्हा बँकेची निवडणूक जाहीर झाल्याने राजयकीय हालचालींना वेग आला आहे. विविध राजकिय पक्षांकडून पॅनेल तयार करून बँक हातात घेण्याची तयारी सुरू झाली आहे. या निवडणूकीच्या निमित्ताने ग्रामिण भागात पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापणार आहे.
परभणी आणि हिंगोली या दोन जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी एकूण १५ मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहेत. परभणी येथे दोन केंद्र असून जिंतूर, गंगाखेड, सोनपेठ, पुर्णा, पालम, सेलू, मानवत, पाथरी याठिकाणी मतदान केंद्रे असणार आहेत. तर हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी, सेनगाव, हिंगोली, औंढा नागनाथ याठिकी प्रत्येकी एका मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- परभणी जिल्ह्यात ५ हजार ८९१ जणांना दिली कोरोना प्रतिबंधक लस
- वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या लाइनमनवर ऑइल टाकून मारहाण
- वीजपुरवठा खंडितचा निर्णय मागे घ्या, आमादार संतोष दानवेंचा आंदोलनाचा इशारा
- नाकावर बेशुध्दीचे पावडर टाकून महिलेचे दागिने लुटले; अंबड नगरपरिषदेसमोरील प्रकार
- कळमनुरीच्या पोत्रा परिसरात भूकंपाचे धक्के सुरूच; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

