Share

नाकावर बेशुध्दीचे पावडर टाकून महिलेचे दागिने लुटले; अंबड नगरपरिषदेसमोरील प्रकार

Published On: 

जालना : रस्त्याने जात असलेल्या महिलेच्या नाकावर विषारी पावडर टाकून बेशुध्द करत दोन भामट्यांनी ३० हजार रुपयांचे दागिने लुटले. ही घटना रविवारी सकाळी अंबड शहरातील नगर परिषद कार्यालयासमोर घडली. संबंधित महिलेने याबाबत अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

दरम्यान, रविवारी सकाळी अंबड येथील इंदूमती त्र्यंबकराव कळकटे या सकाळी नेहमीप्रमाणे स्वामी समर्थ मंदिराकडे दर्शनासाठी निघाल्या होत्या. या दरम्यान दोन भामट्यांनी त्यांच्या नाकावर विषरी पावडर टाकले. त्यामुळे त्यांना चक्कर आली आणि त्या खाली बसल्या.

या दरम्यान, चोरट्यांनी त्यांच्या कानातील सोन्याचे फूल आणि गळ्यातील सोनपोत काढून घेत पोबारा केला. काही वेळानंतर शुध्द आल्यानंतर इंदूमतीबाई यांना अंगावर दागिने दिसले नाही. त्यांनी याबाबत अंबड पोलीस ठाण्यात येऊन अज्ञात संशयिताविरुद्ध फिर्याद दिली आहे. अधिक तपास सहायक निरीक्षक पंतगे करत आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!