🕒 1 min read
मुंबई : महाराष्ट्रात वक्फ मंडळाच्या कोट्यावधी रुपयांच्या जमिनी आहेत. यातील अनेक जागांवर अतिक्रमन झाले आहे. तर काही जागा बनावट कागदपत्रे तयार करुन विकण्यात आल्या आहेत. या सर्व मालमत्ता पुन्हा ताब्यात घेण्यासाठी तसेच त्यांची कागदपत्रे तयार करुन, सविस्तर आराखडा तयार करण्यासाठी वक्फ बोर्डाला ५०० कोटींचे विशेष पॅकेज देण्यात यावे, अशी मागणी वक्फ बोर्डाच्या सदस्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केली आहे.
या संदर्भात वक्फ मंडळाच्या सदस्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. या बैठकीमध्ये या विषयावर सविस्तर चर्चा झाली आहे. या संबंधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत लवकरच बैठक घेवून यावर निर्णय घेण्याचे आश्वासन शरद पवार यांनी दिले आहे. वक्फ बोर्डाच्या सदस्यांनी केलेल्या मागणीचा सकारात्मक विचार करण्यात येणार असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे.
Maharashtra Wakf Baird members met @PawarSpeaks in Mumbai to discuss various issues related to Wakf land.Demanded special package of Rs 500 crore. It was decided to hold joint meeting with @OfficeofUT and concerned ministers on Wakf matters soon. pic.twitter.com/33X0918Ggs
— Imtiaz Jaleel (@imtiaz_jaleel) October 19, 2021
एमआयएमचे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांची वक्फ बोर्डावर नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी या प्रकरणी वारंवार प्रश्न उपस्थित केले आहेत. नुकत्याच झालेल्या मंडळाच्या बैठकीतही या विषयी सविस्तर चर्चा झाली होती. त्यानंतर ही पवार यांची भेट महत्त्वाची मानली जात आहे. या वेळी वक्फ मंडळाच्या सदस्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार फौजीया खान यांचीही उपस्थिती होती.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘ब्लड प्रेशर आणि डायबिटीसचा त्रास मागे लावून घ्यायचा नव्हता म्हणून मी गृहमंत्री नाकारले’
- ‘अंगूठा छाप’ मोदींमुळे आज देशाला ;हे’ भोगावं लागतंय; काँग्रेसची मोदींवर वादग्रस्त टीका
- पेट्रोल-डिझेल सस्ता चाहीए की नहीं? विचारत सत्ता मिळवली; इंधन दरवाढीवरुन राऊतांचा मोदींना टोला
- पवार साहेब, हर्बल तंबाखूच्या उत्पादनाला परवानगी द्या, शेतकरी श्रीमंत होईल- सदाभाऊ खोत
- ‘रवी राणांनी जे केलंय ते चिल्लरगिरी, स्वतःला शेतकऱ्यांचं कैवारी समजतात आणि पदोपदी नौटंकी’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
