🕒 1 min read
पुणे : महाराष्ट्रात पवार घराण्याशी पंगा घेणारा पठ्ठा म्हणून सध्या गोपीचंद पडळकर हे महाराष्ट्राला परिचित आहेत.कधी वादग्रस्त आणि भडक वक्तव्ये तर कधी वाद्र्स्तस्त कृती यामुळे ते नेहमी माध्यमांच्या केद्र्स्थानी असतात. सध्या ते जेजुरी गडावर उभारण्यात आलेल्या अहिल्याबाईंच्या पुतळ्याचं अनावरण करण्याच्या मुद्द्यावरून चर्चेत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते उद्या म्हणजेच शनिवारी या पुतळ्याचं अनावरण करण्यात येणार होतं. मात्र त्याआधीच भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज पहाटे भाजपा समर्थकांसहीत गडावर जाऊन मेंढपाळांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण केलं यामुळे अवघे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
सांगली जिल्ह्यातील आटपाटी तालुक्यातील पडळकरवाडी हे गोपीचंद पडळकर यांचे मूळ गाव आहे. धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर गोपीचंद पडळकर यांनी एकेकाळी रान पेटवले होते. आक्रमक भाषणांसाठी पडळकर यांची महाराष्ट्रभर ख्याती आहे. त्यांना सिनेमाची देखील मोठी आवड आहे.त्यांनी धुमस नावाच्या चित्रपटाची निर्मिती केली असून यात त्यांनी सिनेमाचं लेखन आणि अभिनय केलेला आहे.
भाजप,रासप वंचित बहुजन आघाडी आणि आता पुन्हा भाजप असा पडळकर यांचा प्रवास झाला आहे. वंचित बहुजन आघाडीला सोडत असताना पडळकर यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करून आमदारकी मिळवली.आमदारकीची शपथ घेताना शपथविधी सोहळ्यासाठी गोपीचंद पडळकर खास धनगरी पारंपारिक वेशात विधानभवनात आले होते. पडळकर हे बेधडक मतं मांडण्यासाठी ओळखले जातात. पडळकर विविध कारणांसाठी गेल्या काही दिवसांपासून कायम चर्चेत आहेत. विशेषतः राष्ट्रवादी आणि पवार घराण्याबाबत केलेल्या वक्तव्यांमुळे ते जास्त चर्चेत राहिल्याचं दिसून येत आहे.
नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी धनगर आरक्षणाच्या पडळकर थेट ढोल घेऊन आले. विधान भवनाच्या आवारात ढोल वाजवून त्यांनी सरकारचा निषेध केला.’हे सरकार झोपलेलं आहे, धनगर समाजाचं पारंपरिक वाद्य असलेला ढोल वाजवून या सरकारला जागं करण्याचा प्रयत्न करतोय असं ते म्हणाले होती.पडळकर यांच्या या आंदोलनाची चांगलीच चर्चा झाली होती.
गेल्या सप्टेंबर महिन्यात पडळकर कोरोनामुक्त झाले होते. कोरोनामुक्त गोपीचंद पडळकर यांच्यावर जेसीबीतून पुष्पवर्षाव करण्यात आला. पंढरपूरमधील रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर पडळकरांवर 100 पोती भरुन फुले उधळली होती याची देखील राज्यभर चर्चा झाली होती.
गोपीचंद पडळकर यांनी शरदराव पवार यांच्याबाबत अतिशय अश्लाघ्य भाषेत वक्तव्य केले होते.पडळकर यांनी शरद पवारांवर टीका केल्याने मोठा वाद निर्माण झाला होता.शरद पवार हे या महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे. कारण गेल्या अनेक वर्षापासून ते महाराष्ट्राचं नेतृत्त्व करतात. राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची भूमिका त्यांची राहिलेली आहे. ही भूमिका यापुढेही ते कायम ठेवतील”, असं पडळकर म्हणाले होते. यानंतर ते मोठ्याप्रमाणावर टीकेचे धनी बनल्याचे पाहायला मिळाले होते.
गोपीचंद पडळकर यांनी कर्जत मतदार संघातील खराब रस्त्यावरुन आमदार रोहित पवार यांना देखील लक्ष्य केले होते. खराब रस्त्यावर एक व्हिडीओ करत तो पडळकर यांनी ट्विट केला. यासोबत रोहित पवार यांच्यावर वैयक्तिक टीका देखील केली.यामुळे देखील पवार-पडळकर असा सामना रंगल्याचे पाहायला मिळाले होते.
यानंतर गोपीचंद पडळकर यांनी गोपाळ गणेश आगकरांना आदरांजली वाहिली. मात्र त्या आदरांजलीत फोटो वापरला लोकमान्य टिळक यांचा. त्यामुळे गोपीचंद पडळकर या नावाची पुन्हा एकदा सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती.याशिवाय विधानपरिषद उपसभापतीपदाची निवडणूक अवैध ठरवण्याची मागणी करत गोपीचंद पडळकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती त्यावेळी देखील पडळकर चर्चेत आले होते.
सामनाच्या अग्रलेखात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा फेकूचंद असा उल्लेख केला. त्यानंतर पडळकरांनी संजय राऊतांवर जोरदार हल्ला चढवला होता. पडळकर यांनी राऊतांना थेट पत्रच लिहिलं तेव्हा देखील त्यांची चर्चा झाली. “खरंतर मी आपणास शरद पवारांचा पंटर, खबऱ्या, चमचा असा उल्लेख करु शकलो असतो. परवाच्या सामना दैनिकाच्या अग्रलेखात आपण माझा उल्लेख फेकूचंद असा केला. त्या पद्धतीनं आपला उल्लेख मलाही करता आला असता. पण तो माझा संस्कार आणि संस्कृती नाही. प्रत्येकाशी नम्रपणे बोलले पाहिजे. प्रत्येकाचा उल्लेख सन्मानाने केला पाहिजे हा संस्कार मला माझ्या आईवडिलांनी दिला आहे”, अशा शब्दात पडळकर यांनी राऊतांना खडे बोल सुनावले होते.
महत्वाच्या बातम्या
- सिनेस्टाईल खूनाचा उलगडा; दारू पाजली, गळा आवळला, पेट्रोल टाकून गाडी दरीत लोटली
- पक्षात माझा जीव गुदमरतोय म्हणत ममतांच्या खासदाराचा राजीनामा, तृणमूलला गळती सुरूच
- आजपासून 2000 रुपयांचं डिस्काऊंटसह खरेदी करा रीअलमीचा ‘हा’ नवीन स्मार्टफोन
- पंतप्रधान पदावरच्या व्यक्तीने विरोधकांच्या भूमिकेवर यु-टर्न सारखी शेरेबाजी करणे शोभते का ?
- महाआघाडी सरकारने धनगर समाजाची फसवणूक केल्याचा भाजपचा आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
