🕒 1 min read
लातूर : गेल्या महिन्याच्या तुलनेत या महिन्यात बाजारात सोयाबीनची आवक चांगली होत असल्याचे दिसून येत आहे. तसेच येणाऱ्या काळात सोयाबीनच्या दरात वाढ होण्याची अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध बाजार समित्यांमधील बाजार भावानुसार आज सोयाबीन ला सर्वाधिक 7 हजार 600 रुपये कमाल भाव प्रतिक्विंटल साठी मिळाला आहे.
हा सोयाबीन भाव गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समिती येथे मिळाला, आज गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समिती इथं पिवळ्या सोयाबीनची तब्बल 45 क्विंटल इतकी आवक झाली. यासाठी सर्वात कमी भाव 7 हजार 300, तर सर्वात जास्त भाव 7 हजार 600 मिळाला तसेच सर्वसाधारण भाव 7 हजार 300 रुपये मिळाला.
यानंतर हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला 7 हजार 450 रुपये सर्वाधिक भाव मिळाला. चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 7 हजार 360 रुपये, तर अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला 7 हजार 200 रुपये इतका सर्वाधिक भाव मिळाला आहे. व लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीन ची आज 20 हजार पोत्यांची आवक झाली तर सोयाबीनला 7 हजार 300 रुपये दर मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
