मुंबई : ‘श्याम सिंघा रॉय’ (Shyam Singha Roy) या दाक्षिणात्य चित्रपटात रोझीच्या भूमिकेत सर्वांचे प्रेम मिळवणारी अभिनेत्री साई पल्लवीने (Sai Pallavi) अलीकडेच बुरखा घालून हैदराबादमधील सिनेमागृहाला भेट दिली. या अभिनेत्रीला तिच्या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांची प्रतिक्रिया जाणून घ्यायची होती, म्हणून चक्क तिने हैदराबादमधील श्री रामुलू सिनेमा हॉलमध्ये (Sri Ramulu theatre in Hyderabad) प्रेक्षकांसोबत काळ्या बुरख्यात बसलेली दिसली. हा व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
दरम्यान ‘श्याम सिंघा रॉय’ चित्रपटात अभिनेत्री साई पल्लवी ‘रोझी’ नावाच्या मुलीची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट संपूर्ण देशात नुकताच प्रदर्शित झाला आहे. हाच सिनेमा पाहतांनाचा अभिनेत्री साई पल्लवीचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ती सर्वसामान्यांप्रमाणे चित्रपटगृहामध्ये चित्रपट पाहायला गेल्याचे दिसत आहे. तिने एक अनोखी शक्कल लढवत बुरखा परिधान करुन प्रेक्षकांसोबत चित्रपट पाहण्याचा आनंद घेतला.
https://www.instagram.com/tv/CYGPlBIJ4Ih/?utm_source=ig_web_copy_link
तसेच सिनेमागृहामध्ये स्वत:चाच ‘श्याम सिंघा रॉय’ हा चित्रपट पाहून चित्रपटगृहाबाहेर पडल्यानंतर साईने तिचा चेहरा दाखवला आहे. या व्हिडीओमध्ये ती राहुल संक्रित्यनसोबत (director Rahul Sankrityan) चित्रपट पाहण्यासाठी जात असल्याचे दिसत आहे. चित्रपट पाहिल्यानंतर साई कॅमेरा समोर पोज देते. तसेच गाडीत जाऊन बसण्यापूर्वी स्वत:चा चेहरा कॅमेरासमोर दाखवते. हा व्हिडिओ पाहून चाहत्यांनी लाईक आणि कमेंट केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- राजन तेलींच्या पराभवावर नारायण राणेंची प्रतिक्रिया; म्हणाले…
- अर्थमंत्री येतात, पराभव करुन जातात, त्याला अक्कल म्हणतात; नारायण राणेंचा टोला
- ओबीसी आरक्षणावरुन महादेव जानकरांचा काँग्रेस, भाजपवर गंभीर आरोप
- 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पुण्यात आज ‘या’ रोडवर ‘नो व्हेईकल झोन
- जिल्हा बँकेचा निकाल लागताच राणे समर्थकांनी पुन्हा म्याव म्याव करत सेनेला डिवचलं
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

