Share

माफ कर मित्रा,आम्ही तुला वाचवू शकलो नाही- सत्यजित तांबे

Published On: 

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे : पुण्यात एका वृत्तवाहीनीचे प्रतिनिधी म्हणून काम करणारे पत्रकार पांडुरंग रायकर यांचे बुधवारी पहाटे साडेपाच वाजता निधन झाले. रायकर यांना कोरोनाची लागण झाली होती. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील एका रूग्णालयात उपचार सुरू होते. मात्र आज पहाटे साडेपाच वाजता हृदय विकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले. रायकर हे मुळचे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील होते.

पांडुरंग रायकर यांच्या निधनावर महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी शोक व्यक्त केला आहे. नगर जिल्ह्याचे सुपुत्र, पत्रकार पांडुरंग रायकर यांचे निधन झाल्याच्या बातमीने मी सुन्न झालोय, सर्व मित्र त्याच्यासाठी झटत होते. पुण्यात कोरोनाचं संकट वाढत असताना हॉस्पिटल्समध्ये बेड उपलब्ध नाहीत, खूप प्रयत्न केल्यानंतर जागा मिळाली खरी पण… माफ कर मित्रा, आम्ही तुला वाचवू शकलो नाही, असे सत्यजित तांबे यांनी म्हटले आहे.

तसेच काल मला पुण्यातील पत्रकार मित्रांचे फोन आले होते. मी तातडीने हालचाली केल्या, डी.वाय.पाटील मेडिकल काॅलेजला सोमनाथ पाटीलांनी तातडीने एक बेडची व्यवस्थाही केली होती पण त्याच्यावर उपचार सुरु असतानाच दुर्देवाने त्याचा मृत्यू झाला, असे तांबे म्हणाले.

केंद्र सरकारकडून १४ खरीप पिकांच्या किमान आधारभूत मूल्य वाढीस मंजुरी; शेतकऱ्यांना दिलासा….

काँग्रेसच्या माजी खासदारांच निधन, वयाच्या 91 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास !

उजनीच्या पाण्याचे योग्य नियोजन करण्याची शिवसेना नेते नागेश वनकळसे यांची मागणी

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!