Share

केंद्र सरकारकडून १४ खरीप पिकांच्या किमान आधारभूत मूल्य वाढीस मंजुरी; शेतकऱ्यांना दिलासा….

Published On: 

नवी दिल्ली : शेतकऱ्यांवर येणारी अस्मानी आणि सुलतानी संकटांची मालिका नेहमीच सुरू असते. यामध्ये दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट, पुर परिस्थिती, पिकांवरील रोगांचा प्रादुर्भाव तर पिकांना न मिळणारा योग्य हमीभाव त्याचबरोबर गेल्या पाच महिन्यांपासून कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉक डाऊन मुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला.

या काळामध्ये शेतमाल विक्रीच्या तोंडावर लॉकडाऊन करण्यात आल्याने शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच शासकीय शेतमाल खरेदी पासून देखील अनेक शेतकऱ्यांना वंचित रहावे लागले आहे. यामध्ये प्रामुख्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसलेला दिसून आला. त्यामुळे मराठवाडा, विदर्भ, आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांनी पावसाळा तोंडावर येई पर्यंत शासकीय कापूस खरेदी केंद्रांवर गर्दी केली होती. तर अनेक ठिकाणी खरेदीचे उदिष्ट पूर्ण झाल्यानंतर शासनाकडून खरेदी बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांना संकटाला सामोरे जावे लागल्याच दिसून आले.

‘पुरुष असशील तर राजीनामा दे’ ; निलेश राणेंच आदित्य ठाकरेंना खुले आव्हान

या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने खरीप हंगाम २०२०-२१ साठी १४ खरीप पिकांसाठी जाहीर केलेले हमीभाव शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारे ठरले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी हमीभावाच्या निर्णयाची माहिती दिली. त्यावेळी तोमर म्हणाले, “केंद्रीय कृषी मूल्य आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्रसरकारने देहातील १४ खरीप पिकांच्या किमान आधारभूत मूल्य वाढविण्यास मंजुरी दिली आहे.”

पूरग्रस्तांसाठी पिण्याचे पाणी, भोजन व आरोग्य व्यवस्था प्राधान्याने करा, वडेट्टीवारांचे निर्देश

यामध्ये प्रति क्विंटल याप्रमाणे भात /धान १८६८, भात/धान ए ग्रेड १८८८, ज्वारी २६२०, ज्वारी मालदांडी २६४०, बाजरी २१५०, नाचणी ३२९५, मका १८५०, तूर ६०००, मूग ७१९६, उडीद ६०००, भुईमूग ५२७५, सूर्यफूल ५८८५, सोयाबीन ३८८०, खुरासणी ६६९५, कपाशी (मध्यम धागा) ५५१५, कपाशी लांब धागा ५८२५ अशाप्रकारे हमीभाव जाहीर करण्यात आला असून मागच्या वर्षीच्या तुलनेत वाढवून मिळालेला हमीभाव शेतकऱ्यांसाठी काही प्रमाणात दिलासादायक ठरला आहे.

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना कोरोनाची लागण

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!