🕒 1 min read
सोलापूर प्रतिनिधी: पुणे जिल्ह्यातील बारा धरणांमधून उजनी धरणात मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे उजनी धरणाची पाणी पातळी तब्बल ९ टक्क्यांनी वाढून १०५ टक्के पार झाली आहे. आज दिवसभरात उजनी धरण ११० टक्के भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे उजनी धरणाच्या पाण्याची योग्य नियोजन करण्याची मागणी शिवसेना नेते नागेश वनकळसे यांनी केली आहे.
यंदाच्या वर्षी चांगला पाऊस झाला असला तरी, सोलापूर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेले उजनी धरण कधी भरणार? याकडे संपूर्ण जिल्हा वासियांचे लक्ष लागले होते. दरम्यान पुणे जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सध्या पाऊस सुरू आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील वडज ४०९, डिंभे ४१२०, घोड ३१००, कळमोडी ५६१, चासकमान १८५०, आंध्रा ९४७, पवना २१६०, कासारसाई ५००, मुळशी १०३००, वरसगाव २६६५, पानशेत ३९०८, खडकवासला ११७०४ क्यूसेक्स असा एकूण सुमारे ४२ हजार क्यूसेक्सचा विसर्ग उजनी धरणात सोडण्यात आला आहे.
काँग्रेसच्या माजी खासदारांच निधन, वयाच्या 91 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास !
परिणामी उजनी धरण १०५ टक्के भरले असून धरणाची पाणी पातळी १०० प्लस मध्येच राहणार आहे. बंडगार्डन येथे उजनीत येणारा विसर्ग २२ हजार क्यूसेक्स तर दौंड येथे हाच विसर्ग २३ हजार ८१९ क्यूसेक्स इतका आहे. त्यामुळे उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरले असून आज दिवसभरात पाणी पातळी ११० टक्क्यांच्या पुढे जाऊ शकते. त्यामुळे भीमा नदी सह डाव्या आणि उजव्या कालव्यात पाणी सोडण्याची मागणी पुढे आली आहे. तरीही प्रशासनाने पाणी सोडण्याबाबत कोणतीच उपाययोजना केल्याचे दिसत नाही.
केंद्र सरकारकडून १४ खरीप पिकांच्या किमान आधारभूत मूल्य वाढीस मंजुरी; शेतकऱ्यांना दिलासा….
गतवेळी उजनी धरण १०० टक्के पार झाल्यानंतर भीमा नदीत पाणी सोडल्याने पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. मात्र आता तर उजनी धरण ११० टक्के भरणार आहे. तरीही प्रशासनाचे नियोजन शुन्य आहे. त्यामुळे भीमा नदी सह डाव्या उजव्या कालव्या द्वारे पाणी सोडण्याबाबत प्रशासनाने त्वरित पावले उचलण्याची गरज आहे. अन्यथा भीमा नदी काठच्या गावांना पुराचा फटका बसण्याची शक्यता आहे.
‘पुरुष असशील तर राजीनामा दे’ ; निलेश राणेंच आदित्य ठाकरेंना खुले आव्हान
दरम्यान, उजनी धरण व्यवस्थापन भीमानगर, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण सोलापूर, कृष्णा खोरे विकास महामंडळ पुणे, विभागीय आयुक्त पुणे, जलसंपदा विभाग महाराष्ट्र राज्य यांनी सन्माननीय लोकप्रतिनिधी, उजनी बॅकवाॅटर परिसरातील शेतकरी बांधव यांना विश्वासात घेऊन योग्य प्रकारे समन्वय साधून पाण्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. उजनी धरणातील पाणी पाण्याचे योग्य नियोजन न केल्यामुळे गतवर्षी उजनी धरण अल्पावधीत मायनस -२७ टक्क्यांपर्यंत खाली गेले होते. तर यावर्षी पाऊस चांगला झाल्याने पूर्ण क्षमतेने भरलेल्या उजनीचे प्रशासनाने योग्य नियोजन करावे अशी अपेक्षा शिवसेना नेते नागेश वनकळसे यांनी व्यक्त केली आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
