Share

लवकरच ऐतिहासिक नऊ दरवाजे शहराचे रुपडे पालटणार!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : पर्यटन नगरी म्हणून ओळख असलेल्या ऐतिहासिक औरंगाबाद शहरात शहरातील ९ ऐतिहासिक दरवाजांच्या डागडुजीचा निर्णय वर्षभरापूर्वी मनपाने घेतला होता. औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एएससीडीसीएल) स्मार्ट सिटी अंतर्गत हा प्रकल्प हाती घेण्यात आला असून याच्यात कटकट गेट, नौबत दरवाजा, काला दरवाजा, जाफर गेट, बारापुल्ला गेट, रोशन गेट, पैठण गेट, खिजरी गेट आणि मेहमूद दरवाजा या दरवाज्यांचा समावेश आहे. ही कामे आता अंतिम टप्प्यात आली आहेत. काही ठिकाणची कामे ८० टक्क्यापर्यंत पूर्ण झाले आहेत.

शहरातील ऐतिहासिक दरवाजांची पडझड झाल्याने महापालिकेने नऊ दरवाजांचे संवर्धन व सुशोभीकरण करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र महापालिकेच्या निविदांना प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे ही कामे स्मार्ट सिटीकडे वर्ग करण्यात आले. त्यानंतर इंटेक या कंपनीला प्रकल्प सल्लागार नियुक्त करण्यात आले. प्रकल्प व्यवस्थापक म्हणून स्नेहा बक्षी या काम पाहत आहेत.

तीन कोटी २० लाख रुपये खर्चून ही कामे केली जाणार असून, मार्च २०२१ पर्यंत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र लॉकडाऊनमुळे कामामध्ये अडचणी आल्या. असे असले तरी सध्या ही कामे प्रगतिपथावर आहेत. दरवाजांचे काम तर ८० टक्क्यांपर्यंत पूर्ण झाले आहे. दरम्यान काला गेटचे काम अद्याप सुरू झालेले नाही ते पुढील आठवड्यात सुरू होईल. महमूद गेटचे तज्ज्ञांकडून स्ट्रक्चरल ऑडिट केले जात आहे. अहवाल आल्यानंतर येथील कामे सुरू होतील. दरवाजांच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर त्यावर लायटिंग, माहिती फलक लावले जाणार आहेत.

गेटची झालेली कामे

नौबत गेट- ६० टक्के
खिझरी गेट- ८० टक्के
जाफर गेट- ८५ टक्के
पैठण गेट – ७० टक्के
रोशन गेट- ८० टक्के
कटकट गेट – ७० टक्‍के
बारापुला गेट- ६० टक्के
शाहगंज घड्याळ टॉवर- ६५ टक्के

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!