मुंबई : मुंबई उच्च न्यायालयात बीएमसीच्या नोटीस विरोधात अभिनेता सोनू सूदच्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. अनधिकृत बांधकाम प्रकरणी सोनू सूदविरोधात मुंबई महापालिकेने पोलिसांत तक्रार केली होती. सोनूने मुंबई हायकोर्टात बीएमसीच्या नोटिसला आव्हान दिले आहे. सोनू सूदने जुहू येथील सहा मजली निवासी इमारतीचे आवश्यक परवानग्या न घेता हॉटेलमध्ये रुपांतर केले आहे. पालिकेने या गोष्टीवर आक्षेप नोंदवला होता.
येथील सहा मजली निवासी इमारत आवश्यक परवानग्या न घेता हॉटेलमध्ये रुपांतर केल्याप्रकरणी बीएमसीने अभिनेता सोनू सूद विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. जुहू येथील एबी नायर रोडवरील शक्ती सागर बिल्डींगचे रुपांतर आवश्यक त्या परवानग्या न घेता केल्यामुळे पालिकेने जुहू पोलीस ठाण्यात सूद विरोधात तक्रार केली आहे. सहा मजली निवासी इमारतीचे आवश्यक परवानग्या न घेता हॉटेलमध्ये रुपांतर करण्यात आले आहे. पालिकेने या गोष्टीवर आक्षेप नोंदवला होता.
दरम्यान सोनू सूदने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी आधीच बीएमसीकडून युझर चेंजसाठी परवानगी घेतलेली आहे आणि सध्या ते महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटीकडून परवानगी मिळण्याची प्रतिक्षा करत आहेत. सोनू सूदने या प्रकरणी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. उच्च न्यायालयात आज सुनावणी होणार असून या इमारतीमध्ये कोणत्याही प्रकारचे अनधिकृत बांधकाम केलेले नाही, असा त्याच्या वकिलांनी केला आहे. त्यामुळे, उच्च न्यायालय लॉकडाऊन काळात ‘मसीहा’ बनलेल्या सोनूला दिलासा देणार की कारवाई होणार हे महत्वाचं आहे.
महत्वाच्या बातम्या
- आंदोलक शेतकऱ्यांकडून चिकन बिर्याणी खाऊन ‘बर्ड फ्लू’ पसरवण्याचं षडयंत्र; भाजप आमदाराने तोडले अकलेचे तारे
- राज ठाकरेंची सुरक्षा कमी करणाऱ्या ठाकरे सरकार वरून सरदेसाईंवर झाले मेहरबान
- जनता जर महाविकास आघाडीने त्रस्त असेल तर हल्ला होऊ शकतो; भाजप प्रवक्त्याने वर्तविली शक्यता
- भारतीय चाहत्यांसह सेहवागनेही केलं ट्विटरवर रिकी पाँटिंगला ट्रोल
- सरकारला माघार घ्यावीच लागेल, आम्ही रिकाम्या हाती जाणार नाही; शेतकऱ्यांचा पुन्हा एल्गार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

