Share

स्थलांतरीत मजूर आणि माझं नातं खूप वर्षांपासूनचं, सोनू सूदचं मराठीमध्ये ट्विट

Published On: 

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईत अडकलेल्या मजूरांना गावी जाण्यासाठी मदत करणारा अभिनेता सोनू सूद याच्या कामाची प्रचंड चर्चा सुरु आहे. मात्र, शिवसेना नेते संजय राऊत यांनी सोनू सूदच्या एकूण कार्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सामनातील ‘रोखठोक’ या सदरात संजय राऊत यांनी सोनू सूदला दत्तक घेऊन भाजप नेते उत्तर भारतीय व्होटबँकेचे राजकारण करु पाहत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

या लेखात संजय राऊत यांनी म्हटले आहे की, लॉकडाऊन काळात सोनू सूद हा नवा महात्मा अचानक निर्माण झाला. सूद याने म्हणे लाखो मजुरांना त्यांच्या घरी परराज्यात पोहोचवले. म्हणजे केंद्र व राज्य सरकारने काहीच केले नाही. यानंतर राज्यपालांनी त्याला थेट राजभवनावर बोलावून त्याचे कौतुक केले. महाराष्ट्रातील अनेक संस्था, व्यक्ती, पोलीस, पालिका कर्मचारी, डॉक्टर, परिचारिका आणि बँक कर्मचारी जीवावर उदार होऊन कोरोनाशी लढत आहेत. मात्र, सोशल मीडियावर त्यांचे कधी कौतुक झाले नाही. हा सगळा घटनाक्रम संशय निर्माण करणारा असल्याचे संजय राऊत यांनी म्हंटल आहे.

दिवसभर राज्याचे राजकारण सोनू सूद वरून तापलं असताना रात्री उशिरा अभिनेता सोनू सूद मुख्यमंत्र्यांच्या भेटीला थेट मातोश्रीवर दाखल झाला आहे. त्याच्याबरोबर मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख हे देखील मातोश्रीवर पोहचले आहे. सामना मधील टीकेनंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

यानंतर लगेचच संजय राऊत यांनी सोनू सूदला जोरदार टोला लगावला आहे. ‘अखेर सोनु सुद महाशयांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रयांचा पत्ता सापडला. मातोश्रीवर पोहोचले जय महाराष्ट्र’ अस म्हणत राऊतांनी सोनू सूदला सुनावलं आहे.

दरम्यान या सगळ्यामध्ये सोनू सूद याने मराठी मध्ये ट्विट करत स्थलांतरीत मजूर आणि माझं नातं खूप वर्षांपासूनचं असल्याचं सांगितल आहे. ‘स्थलांतरीत मजूर आणि माझं नातं खूप वर्षांपासूनचं आहे.स्थलांतरीत मजूरांसाठी केलेलं कार्य फक्त एका राज्यापुरतं मर्यादित नाही.काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत ज्याने मला मदतीसाठी बोलावले त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न केला. प्रत्येक राज्याच्या सरकारने माझ्या या कामात सहकार्य केलं.’ अशा भावना सोनू सूद याने ट्विट करून व्यक्त केल्या आहेत.

लॉकडाउन काळात इतर राज्यांत अडकलेल्या कामगारांना त्यांच्या घरी पाठवण्यासाठी गेल्या काही दिवसांत अनेक जणं पुढे येत होती. केंद्र सरकारने मजुरांसाठी विशेष श्रमिक एक्सप्रेस रेल्वे गाड्यांची सोय केली. याचसोबत राज्य सरकारही या कामगारांसाठी विशेष बस गाड्या चालवत होतं. मुंबईत बॉलिवूड अभिनेता सोनू सूदनेही या कामगारांना घरी पाठवण्याची जबाबदारी उचलली. गेल्या काही दिवसांत सोनूने कधी स्वतः पैसे खर्च करत तर कधी चॅरिटी ट्रस्टच्या माध्यमातून या कामगारांना बस, रेल्वे, विमानाने घरी पाठवलं. आतापर्यंत सोनूने कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार, ओडीशा, देहारादून अशा विविध भागातील कामगारांना मदत केली आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!