🕒 1 min read
मुंबई : दरवर्षी, मे महिन्याच्या दुसरा रविवार हा मातृदिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षी मातृदिन 9 मे रोजी साजरा केला जातो. ‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’ हे आपण नेहमीच म्हणतो. खरं आहे, आई आजूबाजूला नसेल तर काहीच सुचत नाही. बाहेरून घरात आल्यानंतर सर्वात पहिली हाक मारली जाते ती आईला. सर्वात पहिले नजर शोधू लागते ती घरात आईला. बाकी कोणी घरात आहे की नाही हे सर्वात पहिले डोक्यात येतच नाही. तुम्ही कितीही प्रयत्न केलात तरी आईची जागा कधी कोणी घेऊ शकत नाही. अशाच आईसाठी काल मातृदिनाच्या निमित्ताने सर्वांनीच आपल्या आईला खास शुभेच्छा दिल्या आहेत.
यावेळी अभिनेता सोनू सूदनं देखील मातृदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत, सोनू सूदच्या शुभेच्छाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. सोनू सूद मुंबईत आल्यानंतर त्याची आई त्याला काही त्याला पत्र पाठवत होती. हीचं पत्र त्यानं शेअर करत आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्याच्या या आठवणी पाहून त्याचे चाहते देखील भावुक झाले आहेत.
मां ❤️ pic.twitter.com/blUEEh8N8h
— sonu sood (@SonuSood) May 9, 2021
सोनूनं आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याचे आईसोबतचे फोटो आणि आईनं हातांनी लिहिलेले काही पत्र आहेत. शिवाय या व्हिडीओच्या बॅकग्राउंडला तारे जमिन पर या चित्रपटातील मा हे गाणं आहे. या व्हिडीओद्वारे त्यानं आपल्या आईबद्दलचं प्रेम व्यक्त केलं आहे. त्याचा हा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओला चाहत्यांकडून भरभरून प्रतिक्रिया येत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- घाटीत कोरोनाग्रस्त बालकांना खेळण्यासाठी खोली मात्र, पालकांनो ही वेळच यायला नको!
- मातृदिनादिवशी धनश्रीने शेअर केला आईचा भन्नाट डान्स ; लिहिली भावनिक पोस्ट
- आता एकाच अर्जाद्वारे मिळणार शेतकऱ्यांना अनेक योजनांचा लाभ
- मायदेशी परतल्यानंतर बोल्टची भावुक पोस्ट, भारतात पुन्हा परतण्याची केली इच्छा व्यक्त
- ‘संजय राऊत काय बोलतात याकडं आम्ही लक्ष देत नाही, अन् सामना देखील वाचत नाही’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
