Share

सोनिया गांधींचे पत्र म्हणजे दबावतंत्र नाही; राऊतांची सारवासारव

Published On: 

🕒 1 min read

मुंबई:- सोनिया गांधी या संयुक्त पुरोगामी आघाडीच्या प्रमुख आहेत. राज्यातलं आघाडी सरकार अस्तित्वात आलं तेव्हा किमान समान कार्यक्रम तयार करण्यात आला होता. त्याविषयीचे काही मुद्दे त्यांनी पत्राद्वारे मांडले आहेत. याचा अर्थ हा दबावतंत्राचा भाग आहे, असं समजण्याचं कारण नाही, अशी सावध प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली आहे. त्यामुळे शिवसेना बॅकफूटवर आल्याचं बोललं जात आहे.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेलं पत्रं म्हणजे दबावतंत्र नाही. उलट त्यांनी या पत्रात किमान समान कार्यक्रमाशी संबंधित काही मुद्दे मांडले आहेत, त्याचं स्वागतच आहे. किमान समान कार्यक्रमात दलित आणि शोषितांच्या विकासाची हमी देण्यात आली आहे. त्यावर आघाडी सरकार काम करत आहेत. स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किमान समान कार्यक्रम कसा लागू होईल, याकडे लक्ष देत आहेत, असंही राऊत म्हणाले.

दरम्यान, राज्यात कोरोनाचं संकट सुरू होतं. त्यामुळे राज्याला मोठी आर्थिक झळ सोसावी लागली. आता कुठे राज्याची आर्थिक गाडी रुळावर येतेय, असं सांगतानाच सोनिया गांधी यांनी या पत्रात मांडलेल्या मुद्द्यांचं स्वागतच असून त्यानुसार काम केलं जाईल, असंही राऊत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!