मुंबई : कोरोनामुळे राज्यासह देशाची परिस्थिती बिकट झाली आहे. राज्यातील महाविकास आघाडीचे नेते वारंवार केंद्र सरकारवर मदतीच्या मुद्द्यावरून टीका करत आहेत. त्यातच आता काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीनींही मोदी सरकारवर याच अनुषंगाने निशाणा साधला आहे. काँग्रेसनं केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
काँग्रेस वर्किंग कमिटीची आज शनिवारी बैठक पार पडली. यावेळी सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर विविध मुद्द्यांवरून टीका केली. भाजप सत्तेत नसलेल्या राज्यांवर केंद्र सरकारकडून अन्याय होत असल्याचा आरोप सोनियांनी केला. केंद्राकडून भाजपा शासित राज्यांना प्राथमिकता दिली जात असल्याचं त्या म्हणाल्या.
काँग्रेसशासित राज्यातील मुख्यमंत्री वारंवार कोरोनासंदर्भातील उपाययोजनासाठी केंद्राकडे मदत मागत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून आवश्यक बाबींची पूर्तता करण्यास सांगत आहेत. पण सरकार यावर कोणतंही पाऊल उचलताना दिसत नाही. काही राज्यांमध्ये लसींचा तुटवडा आहे, व्हेंटिलेटर नाही, ऑक्सिजन संपलंय. या बाबी वारंवार सांगूनही भाजपाशासित राज्यांना प्राधान्य दिलं जात आहे असा आरोप सोनियांनी केला.
दुसऱ्या देशांना मदतीच्या नादात भारतात लसींचा तुटवडा जाणवू लागला आहे. हजारो लोक रोज मरताहेत. पण सरकार मूग गिळून गप्प बसले आहे. रेमडेसिवीर, ऑक्सिजन यासारख्या वस्तूंवर १२ टक्के जीएसटी का घेतला जात आहे? तसेच करोनाविरुद्ध लढण्यासाठी आवश्यक वस्तू असलेल्या ऑक्सिमीटर आणि व्हेंटिलेटरवर २० टक्के जीएसटी का? असा प्रश्नही सोनिया गांधी यांनी बैठकीत उपस्थित केला. कोरोना संबंधित आवश्यक वस्तुंना जीएससीटी करातून मुक्त ठेवण्याची प्रमुख मागणी या बैठकीत करण्यात आली.
महत्वाच्या बातम्या
- देश जळत असताना आधुनिक निरो निवडणूक प्रचारात मग्न’, सचिन सावंतांचा मोदींवर हल्लाबोल
- ‘कोरोना नाहीच, पैशासाठी बिल गेट्सच्या डोक्यातील ही कल्पना’, बंडातात्या कराडकर यांचा दावा
- धक्कादायक! कोरोना वार्डात ऑक्सिजन संपले, दुसरीकडे नेताना महिला रुग्णाचा मृत्यू
- नंदूरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांवर खा.हिना गावित संतापल्या!
- ‘प्रसिद्धीसाठी काही लोकांकडून रेमडेसिवीरचे वाटप’, धनंजय मुंडेंवर पंकजांचा निशाणा


