🕒 1 min read
नवी दिल्ली : राष्ट्रीय पातळीवर काँग्रेस नेत्यांमध्ये असलेली धुसफूस काँग्रेसअध्यक्षपदाच्या निवडीवरून समोर आली आहे. राहुल गांधी यांच्या राजीनाम्यानंतर अध्यक्षपदाची सूत्रे सोनिया गांधी यांच्या हाती देण्यात आली, तर येत्या काही महिन्यांत सोन्या गांधींच्या हंगामी पदाचा कार्यकाळ संपुष्टात येणार होता.
सोमवारी (दि. २४ ऑगस्ट) रोजी कार्यसमितीच्या झालेल्या वादळी बैठकीमध्ये पुन्हा एकदा सोनिया गांधी यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ वाढवण्यात आला आहे. मात्र, यावेळी सोनिया गांधी यांच्या नेतृत्वावर काँग्रेसच्या तब्बल २३ दिग्गज नेत्यांनी पत्र लिहून नाराजी व्यक्त केली होती.
Final year Exams: अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द होणार? सर्वोच्च न्यायालयात आज निकाल
यानंतर, काँग्रेस पक्षातील नेत्यांमध्ये राजकीय वातावरण तापलेलं पाहायला मिळालं. “जर पक्षांतर्गत निवडणुकीत निवडून आलेल्या नेत्याने नेतृत्व केले, तरच काँग्रेस पूर्वीपेक्षा चांगली कामगिरी करु शकेल, अन्यथा पुढील 50 वर्षे काँग्रेसला विरोधीपक्षातच बसावे लागेल” असा इशारा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी दिला.
मंत्री आला की आता त्याला दुधाने अंघोळ घाला; बारामतीत राजू शेट्टी आक्रमक!
यासोबतच त्यांनी सोनिया गांधी यांना पक्षातील नेत्यांचा पाठिंबा नसल्याचे सांगत टीका देखील केली आहे. “सध्या ज्या अध्यक्षांना निवडले गेले आहे, त्यांना एक टक्काही पाठिंबा नसावा. जर कॉंग्रेस कार्यकारी समितीची निवड झाली, तर त्यांना काढता येणार नाही. मग अडचण कुठे आहे?” असा सवाल त्यांनी विचारला. आमच्या प्रस्तावाला विरोध करणाऱ्या जिल्हाध्यक्ष किंवा प्रदेशाध्यक्ष यांना आपले पद गमावण्याची भीती आहे, असेही आझाद म्हणाले.
नागपुरात अभाविपचे अब्दुल सत्तारांविरोधात आंदोलन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

