Share

मंत्री आला की आता त्याला दुधाने अंघोळ घाला; बारामतीत राजू शेट्टी आक्रमक!

Published On: 

🕒 1 min read

पुणे : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी राज्यात ठीक-ठिकाणी आंदोलन पुकारत आहे.राजू शेट्टींनी आज बारामतीत दूध दरवाढीसाठी राज्य सरकारविरोधात एल्गार पुकारला आहे. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात बारामती नगरपरिषद ते प्रांत कार्यालय असा मोर्चा निघाला. यावेळी त्यांनी “आता आक्रमक व्हा, मंत्री आला की दुधाने आंघोळ घाला”, असं आवाहन शेतकऱ्यांना केलं आहे.

राजू शेट्टी बारामतीत दाखल होताच कार्यकर्त्यांनी वाजत गाजत त्यांचं स्वागत केलं. मोर्चात सहभागी झालेले शेतकरी आपल्यासोबत जनावरांनाही घेऊन आले होते. यावेळी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.गोमूत्राची किंमत 110 रुपये लिटर पण आमच्या दुधाला किंमत नाही. असा घणाघात राजू शेट्टी यांनी केला.

राज्यातील दुध उत्पादकांची मोठ्या प्रमाणावर पिळवणूक होत आहे. उत्पादन खर्चापेक्षा निम्म्या दराने दुध उत्पादकांना दर मिळत असून प्रतिलिटर ३० ते ३५ रुपये उत्पादन खर्च असलेल्या दुधाचा दर वाढवून द्यावा, दुधावरील जीएसटी रद्द करावी, केंद्र सरकारने दुधाच्या भुकटी आयातीचा निर्णय रद्द करावा अशा विविध मागण्या राजू शेट्टी यांच्याकडून करण्यात आल्या.

प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना दिलेल्या ३५ कोटींच्या धमकी प्रकरणी एकाला अटक

पुढचा पंतप्रधान लग्न झालेला असावा; महाविकास आघाडीचा पंतप्रधान मोदींवर अप्रत्यक्ष निशाणा

लग्न झालेल्या मुख्यमंत्र्याने घरी बसून काय दिवे लावले? महाविकास आघाडीच्या टीकेवर भाजपा आमदाराने साधला निशाणा

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!