Share

नागपुरात अभाविपचे अब्दुल सत्तारांविरोधात आंदोलन

Published On: 

नागपूर : धुळ्यात विद्यार्थ्यांना मारहाण केल्याप्रकरणी नागपुरात अभाविपच्या सदस्यांनी आंदोलन करून जोरदार घोषणाबाजी केली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर झालेल्या आंदोलनात अब्दुल सत्तार यांचा पुतळाही जाळण्यात आला.

गेल्या पाच महिन्यात कोरोना महामारीने घातलेला कहर व त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात निर्माण झालेली संभ्रमता यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. राज्यातील परीक्षांचा गोंधळ आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या नुकसानीची जबाबदारी घेऊन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राजीनामा द्यावा, मागणी अभाविपने केली होती

याच, पार्श्वभूमीवर धुळ्यामध्ये पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या वाहनाचा ताफा अभाविप आंदोलकांनी अडवला होता. यानंतर, पोलिसांना बळाचा वापर करत या आंदोलकांना हटवावे लागले होते. यानंतर, पोलिसांनी केलेल्या मारहाणीचे व्हिडिओ समोर आल्यानंतर अभाविपने आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून आले. पालकमंत्री अब्दुल सत्तार यांना विद्यार्थ्यांच्या मागण्यांचे निवदेन द्यायचे होते, मात्र त्यांनी वेळ नाकारल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे त्यांचा ताफा जाताना हे आंदोलन करावे लागल्याचे या विद्यार्थ्यांनी सांगितले.

अब्दुल सत्तार यांच्या सांगण्यावरून या आंदोलक विद्यार्थ्यांना पोलिसांनी अमानुष मारहाण केल्याचे आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केले असून, मारहाण करणाऱ्या धुळे पोलिसांवर कारवाईची मागणी देखील करण्यात आली आहे.

तुकाराम मुंढेंनी रोखलेली विकासकामे तत्काळ सुरू करा, या आमदारांची आहे मागणी

प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना दिलेल्या ३५ कोटींच्या धमकी प्रकरणी एकाला अटक

पुढचा पंतप्रधान लग्न झालेला असावा; महाविकास आघाडीचा पंतप्रधान मोदींवर अप्रत्यक्ष निशाणा

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!