Share

‘पहिल्या दिवाळीची तयारी’असे म्हणत सोनालीने केला व्हिडिओ शेअर

Published On: 

मुंबई : दिवाळीला आपल्याकडे अनन्यसाधारण महत्व आहे. त्यात जर दिवाळी लग्नानंतर पहिल्यांदा आली असेल तर आनंदात चारचाँद लागणार हे नक्की. लग्नानंतर येणारी पहिली दिवाळी म्हणजे एक वेगळीच गंमत आणि मजा असते. त्यामुळे नवीन जोडपे या सणाची तयारी देखील खास पद्धतीने करतात. याला अभिनेत्री देखील अपवाद नाही. नुकतेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने एक व्हिडिओ शेअर केला असून या व्हिडिओमध्ये ती हाताला मेहेंदी काढताना दिसत आहे. व्हिडिओ पोस्ट करताना तिने लिहिले, ‘पहिल्या दिवाळीची तयारी.’

सोनालीने याचवर्षी दुबईस्थित कुणाल बेनोडकरशी लग्न केले. त्यामुळे ही दिवाळी सोनालीची लग्नानंतरची पहिलीच दिवाळी आहे. त्यासाठी तिने खास प्लॅनिंग देखील केले आहे. दिवाळीसाठी सोनाली भारतात आली असून, तिने तिच्या हातावर मेहेंदी काढली आहे. सोनालीची ही दिवाळी आणि पाडवा जोरदार साजरा होणार यात शंका नाही. सोनालीच्या या व्हिडिओवर अनेक कलाकार आणि तिचे फॅन्स कमेंट्स करून तिला दिवाळीच्या शुभेच्छा देताना दिसत आहे.

https://www.instagram.com/reel/CV0FFInFSvM/?utm_medium=copy_link

सोनालीने मराठी आणि हिंदीमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केले असून, तिला खरी ओळख रवी जाधव यांच्या ‘नटरंग’ सिनेमातून मिळाली. या सिनेमाने तिला तिच्या ओळखीसह ‘अप्सरा’ हे नवीन नाव देखील दिले. अगदी या नावाला साजेसे सौंदर्य असणारी सोनाली नृत्यातही पारंगत आहे. नुकतच तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केलेल्या या व्हिडिओवर भरपूर लाईक, कमेंट येत आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!