अहमदनगर : भाजप आमदार नितेश राणे हे ट्विटर वर फार सक्रीय असतात. वेळोवेळी ट्विटच्या माध्यमातून आपल्या विरोधकांवर निशाणा साधताना दिसतात. आता त्यांनी वेगळ्याच स्टाईलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. अमेझॉन या प्रसिद्द विक्री संकेतस्थळावरील अलेक्साशी तुलना रोहित पवार यांच्याशी केली आहे. यावर आता रोहित पवारांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
एखादा मुद्दा चुकीचा असेल आणि त्याबाबतीत बोलले तर बरं होईल. एखादी बातमी व्हावी या विशिष्ट हेतूने त्यांनी हे ट्विट केलं असावं, असं म्हणत रोहित पवारांनी नितेश राणेंना टोला लगावला. पवार साहेब हे आपले आवडते नेते असल्याचं नारायण राणे स्वतः सांगतात. मात्र, तुम्ही शरद पवारांविरोधात बोलता. म्हणजे तुम्ही अप्रत्यक्षपणे वडिलांच्या विरोधात बोलता की काय? असा प्रश्न उपस्थित होतो. राजकारणात विरोध असू शकतो. पण चर्चा होणंही महत्त्वाचं आहे. चर्चा करायची असेल तर आपण सर्वांनी महाराष्ट्राच्या आणि राज्यातील जनतेच्या बाजूने चर्चा करणं अधिक योग्य राहिल, असेही रोहित पवार म्हणाले.
नितेश राणेंचे ट्विट –
Amazon ke paas Alexa hai ..
Toh Maharastra ke pass Rohit Pawar hai..
Dono SAB JANTE HAI !!
Sirf Alexa ko switch off kar sakte hai.. rohit pawar ko nahi ????
— Nitesh Rane (@NiteshNRane) May 12, 2022
अमेझॉनकडे अॅलेक्सा आहे तर महाराष्ट्राकडे रोहित पवार आहेत. दोघांनाही सगळं काही माहीत असतं. फक्त अॅलेक्साला स्वीच ऑफ करता येते, मात्र रोहित पवारांना नाही, असा खोचक टोला त्यांनी लगावला. रोहित पवार हे नुकतेच अयोद्धेत जाऊन आले आहेत. या यात्रेतून रोहित पवारांनी उत्तरेतील सर्वधर्मीय विविध तीर्थस्थळांना भेटी दिल्या आहेत. रोहित पवार यांनी विविध स्थळांना दिलेल्या भेटी छायाचित्रे, आपली राजकीय मते ट्विटरच्या माध्यमातून सोशल मीडियावर पोस्ट केल्या आहेत. ते सतत पोस्ट करत असतात. यावरून नितेश राणे यांनी रोहित पवार यांची तुलना अॅलेक्साशी केली आहे.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

