Share

अबू आझमी ठाकरे सरकारचा जावई, निलेश राणेंचा टोला

Published On: 

मुंबई : मुंबईच्या शिवाजी नगर गोवंडी विभागाचे आमदार अबू आझमी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची भव्य मिरवणूक रथातून काढण्यात आली.या शेकडोच्या संख्येने त्यांचे कार्यकर्ते रॅली मध्ये सहभागी झाले होते. यावेळी फटाके फोडून, घोषणा देत कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.शिवाजीनगर परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा असतानाही त्यांच्यासमोर करोना नियमांचे सर्रास उल्लंघन होत होते. तर कार्यकर्त्यांनी भेट दिलेली तलवार देखील आझमी यांनी भर रस्त्यात हवेत फिरवली.

यावर अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांनी टीका केली आहे. तसेच भाजप नेते निलेश राणे यांनी या मुद्द्यावरून ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, ‘वाढदिवसाला गर्दी गोळा करून तलवारी नाचवून अबू आझमी ठाकरे सरकारचा जावई असावा.’ अशा जहरी शब्दात त्यांनी टीका केली आहे. दरम्यान सुमारे पाचशे ते हजार जण या मिरवणुकीत सहभागी झाल्याने या ठिकाणी सामाजिक अंतराचे तीन तेरा वाजले होते. पोलिसांनी एका कार्यकर्त्याकडून तलवार जप्त केली आहे. आमदार आझमी वगळता आयशा खान, रुखसाना सिद्दीक, सद्दाम खान, अताऊ सईद खान, वसीम जफर शेख अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत, असे पोलिसांनी सांगितले.

तसेच, या घटनेचा व्हिडीओ समोर आल्याने टीकेची झोड उठली आहे. मात्र ती तलवार धारदार नव्हती, तर फक्त शोबाजीची होती. तसं तर मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही पाहिलंय स्टेजवर, असं स्पष्टीकरण अबू आझमींनी दिलं. वाढदिवसाच्या वेळी आम्ही एकही केक कापला नाही. मी कार्यकर्त्यांना विनंती केली होती, की वाढदिवसाच्या वेळी पैसे जमा करा, वायफळ खर्च करु नका, तर जिथे पूर आला आहे, तिथे मदतकार्याला पाठवा. काही कार्यकर्त्यांनी फटाके फोडले, पण कोणाकोणाला समजवणार, कोणी हातात लाठी दिली, कोणी तलवार दिली, ठीक आहे, कार्यकर्त्यांमध्ये जोश असतो, ती तलवार धारदार नव्हती, तर फक्त दिखाव्यापुरती होती. हे कायदेविरोधी आहे, असं मला वाटत नाही असे ही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!