🕒 1 min read
नवी दिल्ली:- काँग्रेसच्या 23 नेत्यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून पक्षातील संघटनात्मक बदलांची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर आज हे नेते सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. सोनिया गांधी यांच्या घरीच होणाऱ्या या बैठकीला काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह पक्षातील काही मोजकेच नेते उपस्थित राहणार आहेत.
पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराज असलेले परंतु या पत्रावर सह्या न केलेले नेतेही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे हे 23 नेते पक्षांतर्गत बदल करण्यास पक्षनेतृत्वाला भाग पाडतात की पक्षनेतृत्वालाच आव्हान दिलं म्हणून विजनवासात जाणार? याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, काँग्रेस पक्ष आणि लोकशाहीला वाचवण्यासाठी सोनिया गांधी यांना पुत्र मोह सोडावा लागेल, असे वक्तव्य राष्ट्रीय जनता दलाचे नेते शिवानंद तिवारी यांनी केले आहे. सोनिया गांधी यांनी पंतप्रधानपदाच्या खुर्चीचा मोह टाळून काँग्रेस पक्षाला वाचवले होते. मात्र, आज त्याहूनही जास्त महत्त्वाची वेळ असून सोनिया गांधी यांनी पुत्र मोह बाजुला सारून लोकशाही व्यवस्था वाचवण्यासाठी पावले उचलली पाहिजेत, असे तिवारी यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.
राहुल गांधी हे उदासीन नेते आहेत. ते स्वत:च्या पक्षातील लोकांना प्रोत्साहित करू शकत नाहीत मग जनतेची गोष्ट तर सोडाच. त्यांच्या पक्षातील लोकांचाच त्यांच्यावर विश्वास नाही. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी काँग्रेस पक्ष तोंडघशी पडत असल्याचे शिवानंद तिवारी यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
- त्या’ व्हायरल व्हिडिओवर चौकशी दरम्यान करणचे अजब उत्तर
- मुंबईत अंबानी-अदानी विरोधात निघणार शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा
- राष्ट्रीय महामार्गावर 1 जानेवारी पासून ‘फास्टॅगची’ अंमलबजावणी
- “अजित पवार भ्रष्टाचाराचे आरोप आणि घाणेरड्या वक्तव्यांमुळेच चर्चेत असतात”
- कृषि विभागाच्या सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे मिळवायचा आहे ? मग ‘असा’ करा अर्ज
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
