टीम महाराष्ट्र देशा : सध्या करोना विषाणूमुळे होणाऱ्या कोव्हिड – 19 या आजाराचा जगभर प्रादुर्भाव वाढला आहे. भारतात तर दुसऱ्यांदा लॉक डाऊन करण्यात आले.तरी देखील परिस्थिती आटोक्यात येत नाही. अशातच संचार बंदी असल्यामुळे लोकांना घरातूनच आपले कामं करावी लागत आहेत. यातून बऱ्याच लोकांना आपले छंद सुद्धा जोपासता येत आहेत. दिग्दर्शक अभिषेक पवार यांनी आपल्या मनातील भावना ‘ महाराष्ट्र देशा ‘ सोबत शेअर केल्या आहेत.ते काय म्हणाले आहेत ते बघुया त्यांच्याच शब्दात…
शास्त्र – शुद्ध खोटं बोला आणि पैसे कमवा…
– अभिषेक पवार,(दिग्दर्शक आणि लेखक)
पडद्यावर दिसणारा कलाकार हा कधीच कुणीच नसतो.तरी सुद्धा तो कोणत्या ना कोणत्या नावाने प्रसिद्ध असतो.’ शोले ‘ फेम गब्बर अर्थात अमजद खान जगातलं सगळ्यात सोपं आणि उत्तम उदाहरण. अहो किती खोटं बोलतो हा माणूस. ‘ दूर गाव मै जब बच्चा रोता है तो मॉ बोलती हैं, बेटा सों जा नही तो गब्बर आ जायेगा ! तरी देखील आपण त्याच्यावर प्रेम करतो. जरा विचार करा आपण अमजद खानवर प्रेम करतो का गब्बरवर .तर आपण दोघांवरही प्रेम करत नाही. अमजद खान गब्बरच्या भाषेत आपल्याला आवडेल असं खोटं बोललाआणि त्यावरचं आपण प्रेम केलं. म्हणजे आपण बोली भाषेत म्हणतो मला त्यांचा अभिनय किंवा ‘ अॅक्टींग ‘ खूप आवडते.
आता अॅक्टींग किंवा अभिनय म्हणजे काय ?
अभिनय किंवा अॅक्टिंग हा आपल्या दैनंदिन जीवनातील रोजचाच प्रक्रार आहे.लहान असतांना तुम्ही एखादा हावभाव नातेवाईकांसमोर करुन दाखवत असता आणि ते देखील तुम्हाला परत – परत तेच करायला लावतात.कारण तुमच्या अभिनयानं त्यांना आनंद मिळत असतो. आपण आपल्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत हावभाव करत असतो.मग या सगळ्यालाच अभिनय म्हणायचं का ? तर नाही.
मग अभिनेता किंवा अभिनेत्री कुणाला म्हणायचं?
त्याचं उत्तर सोप्पंय जो व्यक्ती त्याच्या हावभावाचं, खोटं बोलण्याचं रूपांतर पैशामध्ये करु शकतो आणि आपला उदरनिर्वाह चालवू शकतो तो अभिनेता किंवा अभिनेत्री.पण हे सगळं इतकं सोप्पं आहे का ? की सिनेमा मध्ये ,नाटकामध्ये किंवा इतर कोणत्याही ठिकाणी काहीही खोटं बोललो आणि पैसे मिळाले तर नाही. त्याला एक शास्त्र शुद्ध पद्दत आहे.आणि आपण ही शास्त्रशुद्ध पद्धत आपण शिकली पाहिजे.ज्यामुळे आपल्याला समजतं की आपण कुणासमोर काय आणि कशा पद्धतीने खोटं बोललं पाहिजे.की जेणे करून समोरच्या व्यक्तीला ते आवडेल आणि उदरनिर्वाह चालतं राहील.
(अभिषेक पवार हे पुणे विद्यापीठातून ‘ ललित कला केंद्रातून ‘ स्नातक आहेत.त्यांनी अनेक माहितीपट दिग्दर्शित केले आहेत.)
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

