🕒 1 min read
पिंपरी-चिंचवड : कोरोनावर मात करण्यासाठी देशातील अधिका-अधिक नागरिकांचे लसीकरण होणे गरजेचे आहे. राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता धास्तावलेल्या जनता लसीकरणाला चांगला प्रतिसाद देत आहे. मात्र, एकीकडे कोरोनाचा वाढता धोका तर दुसरीकडे लसींचा तुटवडा यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
लसींचा तुटवडा असल्याने मोजक्याच ठिकाणी लसीकरण केले जात आहे. तर, नोंदणी केल्यानंतरच लसीकरण होत असले तरी साठा उपलब्ध झाला नसल्याचे कारण लसीकरण केंद्रावर दिले जात असल्याने अनेक नागरिकांना विना लसीकरणच माघारी यावं लागत आहे. यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेने आता थेट लस उत्पादकांकडून लस खरेदी करण्याची तयारी दर्शवली असून राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी परवानगी द्यावी अशी मागणी महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केली आहे.
महापौर उषा ढोरे यांचे राजेश टोपेंना पत्र –
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची कोरोना परिस्थिती सद्यस्थितीत नियंत्रणात असली तरी कोरोना विषाणूचा वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन शहरातील नागरिकांचा बचाव करणे तसेच आरोग्य व्यवस्थेवरील ताण कमी करणेकामी महापालिका हद्दीतील १८ वर्षावरील सर्व नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देणे आवश्यक आहे. त्यामुळे महापौर उषा उर्फ माई ढोरे यांचे अध्यक्षतेखाली पदाधिका-यांची नुकतीच तातडीची बैठक घेण्यात आली होती.
त्यामध्ये शासनामार्फत महानगरपालिकेस उपलब्ध होणारा कोवीड लसींचा तुटवडा जाणवत असल्याचा विचार करुन शहरवासीयांसाठी सुमारे १५ लाख लस थेट उत्पादकाकडून खरेदी करण्याचा आणि त्यासाठी राज्य शासनाची परवानगी घेणेबाबत बैठकीत एकमताने निर्णय घेण्यात आला होता.
त्याअनुषंगाने महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी थेट महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांना पत्र दिले असून शहरातील सद्यस्थितीचा व भविष्यात उद्भवू शकणा-या कोरोनोच्या गंभीर परिस्थितीचा विचार करुन पिंपरी चिंचवड शहरवासीयांसाठी महापालिका खर्चाने थेट उत्पादकांकडून लस खरेदी करण्यास परवानगी द्यावी आणि सहकार्य करावे, अशी विनंती पत्राद्वारे केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- घाटीत कोरोनाग्रस्त बालकांना खेळण्यासाठी खोली मात्र, पालकांनो ही वेळच यायला नको!
- पुणेकरांनो सकाळी ११ नंतर घराबाहेर पडाल तर खबरदार; लॉकडाऊन होणार आणखी कडक
- महाराष्ट्र जिंकणार : राज्यात आज नव्या कोरोना बाधितांचा आकडा ४० हजारांखाली !
- मायदेशी परतल्यानंतर बोल्टची भावुक पोस्ट, भारतात पुन्हा परतण्याची केली इच्छा व्यक्त
- नुसत्या जाहिरातीच्या माध्यमातून कोरोना संपणार नाही, नवाब मलिकांचा हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

