Share

‘पॅकेज म्हणा किंवा काहीही, पण पूरग्रस्तांना मदत करा’; फडणवीसांचा ठाकरेंना टोला

Published On: 

कोल्हापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा दोन वेळा कोल्हापूर दौरा पुढे ढकलण्यात आल्यानंतर अखेर आज(दि. ३० जुलै) रोजी ते कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. शिरोळ तालुक्यातील पुरस्थितीचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी कोल्हापूर शहरातील शाहूपुरी भागातील पाहणी केली. यानंतर सर्व अधिकारी, आमदार, खासदार, जिल्ह्यातील मंत्री यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे देखील कोल्हापूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी लवकरात लवकर मदत जाहीर करून पूरग्रस्तांना दिलासा द्यावा अशी मागणी करतानाच महाविकास आघाडी सरकार हे केंद्रावर ढकलून पळवाटा काढत असल्याची टीका केली होती. यावर ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.

‘नागरिकांनी दरवर्षी कष्टाने कमावलेलं वाया जातंय. हे थांबावं म्हणून तात्पुरतं नाही तर कायमस्वरूपी मदत करण्याची गरज आहे. माझ्यासोबत सर्व प्रशासन आहे. आढावा घेऊन योग्य मदतीसाठी माहिती घेत आहे. मी फक्त पॅकजची घोषणा करणारा नाही तर मदत करणारा मुख्यमंत्री आहे.’ असा टोला उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना लगावला आहे. तर, देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर देऊन ठाकरेंच्या या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘पॅकेज असो की घोषणा, सामान्य माणसाला पैसे मिळणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री त्याला काहीही म्हणू देत,’ असं फडणवीसांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!