Share

‘काही पक्ष जाणीवपूर्वक ढोंगबाजी करत आहे, शेतकऱ्यांना गुमराह करण्याचा प्रयत्न केला जातोय’

Published On: 

🕒 1 min read

नागपूर:- कृषी कायद्यांविरोधात राजधानी दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला आता ६० दिवस उलटून गेलेत. केंद्रातील मोदी सरकारकडून लागू करण्यात आलेल्या कृषी कायद्यांविरोधात २६ नोव्हेंबरपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसलेत. या शेतकऱ्यांत विशेषत: पंजाब आणि हरीयाणातल्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. असं असलं तरी देशभरातील विविध शेतकरी संघटना आणि श्रमिक संघटनांनी शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे.

सरकार आणि आंदोलकांमध्ये अनेक चर्चाही झाल्या परंतु, या चर्चेत काही तोडगा निघू शकलेला नाही. सर्वोच्च न्यायालयाकडून या कायद्यांना स्थगिती देतानाच पाच सदस्यीय समितीची नेमणूक करण्यात आली. या समितीत कृषी कायद्यांच्या समर्थकांचा सहभाग असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे.

दरम्यान, अखिल भारतीय किसान सभेच्या मोर्चाचं वादळ काल रात्री अखेर मुंबईत पोहोचलं आहे. या मोर्चामध्ये ट्रॅक्टर, जीप इत्यादी वाहनांसह हजारो शेतकरी सहभागी झाले आहेत. आज, 25 जानेवारीला हा मोर्चा राजभवनावर धडकणार आहे. केंद्र सरकारनं लागू केलेल्या नव्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या 60 दिवसांपासून दिल्लींच्या वेशींवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रात अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं हा मोर्चा काढण्यात आला आहे. राज्यभरातील विविध जिल्ह्यांमधील शेतकरी मोठ्या संख्येने या महामोर्चात सहभागी झालेले आहेत.

दरम्यान, महाराष्ट्रात कृषी विधेयक येऊन इतके दिवस झाले कुठलंही आंदोलन झाले नाही, काही पक्ष जाणीवपूर्वक ढोंगबाजी करत आहेत. शेतकऱ्यांना गुमराह करण्याचा प्रयत्न करत आहेत, शेतकऱ्यांना चुकीच्या गोष्टी सांगण्यात येत आहेत, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. आंदोलनातील शेतकऱ्यांना भडकविण्याचं काम काही पक्ष करत असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे.

जे लोकं या मोर्चाच्या निमित्ताने मंचावर जात आहेत त्यांना माझा सवाल आहे काँग्रेस पक्षाने आपल्या 2019 च्या जाहीरनाम्यात बाजारसमित्या रद्द करु असं म्हटलं होतं. मग आता काय झालंय, आम्ही तर बाजार समित्या बरखास्त करु असं म्हटलंही नाही. मग शेतकऱ्यांना भडकवून हे नेते काय साध्य करु पाहत आहेत, असा सवाल फडणवीसांनी उपस्थित केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!