Share

ग्रामसेवकाची बदली रद्द करण्यासाठी ग्रामस्थांचे उपोषण

Published On: 

लातूर : शासकीय अधिकाऱ्यांच्या विरोधात आंदोलन, निदर्शने, मोर्चे अनेकदा बघायला मिळतात. पण काही त्याला अपवाद असतात. काही प्रशासकीय आधिकारी हे मात्र जनतेचे हिरो बनतात. तुकाराम मुंढे, सुनिल केंद्रेकर यापैकी काही उदाहरणे. अशाच एका ग्रामसेवकासाठी लातूर मधील पाखरसांगवी येथील ग्रामस्थांनी उपोषण सुरू केलं आहे.

विष्णू भिसे या ग्रामसेवकासाठी पाखरसांगवी येथील ग्रामस्थानी तहसिल कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. ग्रामसेवक गावाच्या विकासातील एक महत्वाचा घटक असतो. मागील दोन वर्षापासून विष्णू भिसे हे ग्रामसेवक म्हणूण पाखरसांगवी ग्रामपंचायतमध्ये कार्यरत आहे. त्यांच्या कामावर ग्रामस्थ समाधानी आहेत. विष्णू भिसे हे चांगल्या प्रकारे कामकाज करत असून त्यांच्या पारदर्शक शैलीमुळे ग्रामस्तरावरील कारभार सुरळीत सुरु आहे.

पण काही विरोधकांनी गटविकास अधिकाऱ्यांशी संगनमत करुन ग्रामसेवक भिसे यांच्या बदलीसाठी प्रयत्न केले. कार्यालयीन चौकशी ची धमकी देऊन त्यांना वैद्यकीय रजेवर पाठवण्याचे षडयंत्र रचले. या ना त्या प्रकारे ग्रामपंचायतीच्या कारभारातून भिसे यांना हद्दपार करण्याचा प्रयत्न केला. भिसे यांना सक्तिच्या रजेवर पाठवून पंचायत समिती प्रशासनाने त्यांचा पदभार दुसऱ्या ग्रामसेवकाकडे सोपविल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. भिसे यांची बदली रोखली जावी या मागणीसाठी पाखरसांगवी गावातील ग्रामस्थांनी तहसिल कार्यालयासमोर मागील दोन दिवसांपासुन उपोषण सुरू केले आहे. भिसे यांची बदली होऊ नये यासाठी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी, जि. प. चे मुख्य कार्यकारी आधिकारी, तहसिलदार व पोलीस प्रशासनाला निवेदन दिले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!