🕒 1 min read
मुंबई:- कृषी कायद्यांविरोधात राजधानी दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला आता ६० दिवस उलटून गेलेत. केंद्रातील मोदी सरकारकडून लागू करण्यात आलेल्या कृषी कायद्यांविरोधात २६ नोव्हेंबरपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसलेत. या शेतकऱ्यांत विशेषत: पंजाब आणि हरीयाणातल्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. असं असलं तरी देशभरातील विविध शेतकरी संघटना आणि श्रमिक संघटनांनी शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे.
सरकार आणि आंदोलकांमध्ये अनेक चर्चाही झाल्या परंतु, या चर्चेत काही तोडगा निघू शकलेला नाही. सर्वोच्च न्यायालयाकडून या कायद्यांना स्थगिती देतानाच पाच सदस्यीय समितीची नेमणूक करण्यात आली. या समितीत कृषी कायद्यांच्या समर्थकांचा सहभाग असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे.
दरम्यान, अखिल भारतीय किसान सभेच्या मोर्चाचं वादळ काल रात्री अखेर मुंबईत पोहोचलं आहे. या मोर्चामध्ये ट्रॅक्टर, जीप इत्यादी वाहनांसह हजारो शेतकरी सहभागी झाले आहेत. आज, 25 जानेवारीला हा मोर्चा राजभवनावर धडकणार आहे. केंद्र सरकारनं लागू केलेल्या नव्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या 60 दिवसांपासून दिल्लींच्या वेशींवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रात अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं हा मोर्चा काढण्यात आला आहे. राज्यभरातील विविध जिल्ह्यांमधील शेतकरी मोठ्या संख्येने या महामोर्चात सहभागी झालेले आहेत.
दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आज आझाद मैदानात येणार आहेत. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे आझाद मैदानातील आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेणार आहेत. राज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून आदित्य ठाकरेंना पाठवण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचं शेतकरी नेते अजित नवले यांनी सांगितलं. आदित्य ठाकरे मोर्चात येणार असल्याने त्याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘लवकरच भारतात येतोय’ ; बेन स्टोक्सने ट्विटरवर पोस्ट करत दिली माहिती
- राज्यात पोलिसांसाठी एक लाख घरे बांधणार; गृहमंत्री अनिल देशमुख यांची मोठी घोषणा
- ‘शेतकरी कायद्यांना विरोध करणाऱ्या राजकारणी मंडळींचा हा दुटप्पीपणा किळसवाणा आहे’
- बारामती तालुक्यातील विकास कामे दर्जेदार पद्धतीने आणि गतीने पूर्ण करा : अजित पवार
- आयपीएलच्या इतिहासातील सर्वोच्च बोली यंदा; मलिंगाच्या जागी ‘या’ खेळाडूची लागू शकते वर्णी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
