🕒 1 min read
सांगली : भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पक्षाला रामराम ठोकल्या नंतर आता सांगलीत भाजपला आणखी एक धक्का बसला आहे. काल भाजपाचे माजी सांगली शहर जिल्हा उपाध्यक्ष नानासाहेब शिंदे आणि जिल्ह्यातील भाजपाच्या काही आजी माजी पदाधिकाऱ्यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी मुख्यमंत्र्यांचे सचिव मिलिंद नार्वेकर, सांगली जिल्हा संपर्क प्रमुख नितीन बानूगडे – पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख संजय विभूते, उपस्थित होते.
“यापुढे होणाऱ्या ग्राम पंचायत, पालिका निवडणुकीमध्ये शिवसेना मोठ्या ताकदीने उतरणार आहे” असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भाजप नेत्यांना शिवबंधन बांधताना म्हणाले.
भाजपने शेतकरी आणि ग्रामीण भागातील लोकांची बोळवण केल्यानेच नानासाहेब शिंदे, प्रदीप माने, अविनाश पाटील जयवंत माळी यांच्यासारखे कार्यकर्ते भाजपला रामराम ठोकत असल्याचंही उद्धव ठाकरे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- भाजपमधील काही आमदार राष्ट्रवादीत जाणार? मलिक-भुजबळ म्हणाले…
- पंतप्रधान मोदींनी कडेकोट बंदोबस्ताशिवाय गुरुद्वारामध्ये दिली अचानक भेट
- अकाली दल-शिवसेनेच्या जाण्याने एनडीएमध्ये रिकामी झालेली जागा भरून काढणार ‘हा’ पक्ष ?
- नागपूर : २१ डिसेंबर पासून पाणी बिलावरीलही शास्ती होणार माफ
- नागपूर मनपाच्या माध्यमातून आठ हजार पथविक्रेत्यांना खेळते भांडवल कर्ज मंजुर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
