नवी दिल्ली – केंद्र सरकारने केलेल्या तीनही कृषी विधेयकाविरोधात शेतकऱ्यांचे गेले अनेक दिवस दिल्लीच्या वेशीवर आंदोलन सुरु आहे. यावर तोडगा काढण्यासाठी शेतकरी आणि केंद्र सरकारच्या चर्चा निष्फळ ठरत आहे. सरकार चर्चेला तयार आहे. पण कृषी कायदे रद्द केले पाहिजेत त्यानंतरच चर्चा असे शेतकऱ्यांची मागणी आहे.
दरम्यान,दुसरीकडे एनडीएचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टीचे(आरएलपी) अध्यक्ष खासदार हनुमान बेनीवाल यांनी काल(शनिवारी) शेतकरी आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी तीन संसदीय समित्यांचा राजीनामा लोकसभा अध्यक्षांना पाठवल्याने, आता कृषी कायद्याच्या मुद्यावरून आणखी एक मित्रपक्ष एनडीएची साथ सोडणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
दरम्यान, विविध कारणे समोर करत एनडीएला अकाली दल, शिवसेना, तेलुगू देसम पक्ष अशा घटक पक्षांनी या आधीच रामराम ठोकला आहे. या पक्षांच्या जाण्याने एनडीएमध्ये मोठी स्पेस निर्माण झाली आहे. हीच गोष्ट लक्षात घेऊन आता जगनमोहन रेड्डी हे भाजप सोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे.
रेड्डी हे नेहमी भाजपच्या शीर्षस्थ नेत्यांच्या संपर्कात असतात याशिवाय दुश्मनाचा दुश्मन आपला दोस्त या उक्तीप्रमाणे भाजप देखील रेड्डी यांना त्यांच्या राज्यात पूरक अशीच भूमिका घेताना दिसून येत आहे.त्यामुळे रेड्डी यांच्या वाईएसआर कांग्रेस पक्षाच्या रूपाने नवा मित्र एनडीएमध्ये येणार का याबद्दल तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- भाजपमधील काही आमदार राष्ट्रवादीत जाणार? मलिक-भुजबळ म्हणाले…
- ‘रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्या प्रमाणे वागू नये’; नव्या संसद भवनावरून राऊतांची मोदींवर टीका
- करोनाची लस बनवणाऱ्या कंपन्यांना सरकारनं कायदेशीर संरक्षण द्यावं – पुनावाला
- मा. गो. वैद्य यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शोक व्यक्त
- पुत्र मोह सोडा, लोकशाही वाचवा; ‘या’ नेत्याने सोनिया गांधींना दिला सल्ला!


