मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रादेशिक वादावरून गुजरातला लक्ष्य करत टीका केली आहे. अंतरराष्ट्रीय स्तरावर मुंबईला बदनाम करण्याचा कट सुरु असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा (IFSC) केंद्र गुजरातला हालवण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून राज्यातील नेत्यांनी केंद्र सरकार आणि भाजपला लक्ष्य करत टीकेची झोड उठवली आहे. त्यातच आता जितेंद्र आव्हाड यांनीही भर टाकली आहे. ते म्हणाले की, आंतरराष्ट्रीय स्तरावर मुंबईला बदनाम करण्याचा कट पद्धतशीरपणे रचला जात आहे हे दिसून येतंय आणि मुंबईचा लचका तोडण्यासाठी टपून बसलेले लोक अजूनही या देशात आहेत आणि त्यांचं घर आपल्या बाजूलाच आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर मुंबईला बदनाम करण्याचा कट पद्धतशीरपणे रचला जात आहे हे दिसून येतंय आणि मुंबईचा लचका तोडण्यासाठी टपून बसलेले लोक अजूनही या देशात आहेत आणि त्यांचं घर आपल्या बाजूलाच आहे.#आमची_मुंबई
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) May 11, 2020
दरम्यान जितेंद्र आव्हाड हे नुकतेच आजारातून स्थिरावले आहेत. गेले अनेक दिवस ते रुग्णालयात स्वतःवर उपचार घेत होते. रुग्णालयातून येताचं जितेंद्र आव्हाड यांनी जनतेला कळकळीचे आवाहन केले आहे. आपण सुरीक्षित राहा कोरोनाला गांभीर्याने घ्या. मी जी चूक केली ती तुम्ही करू नका, असे आवाहन आव्हाड यांनी केले आहे.
त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटरद्वारे हे आवाहन केले आहे. ते म्हणाले की, मी सुरुवातीला कोरोनाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केलं. मात्र सुदैवानं मी यामधून वाचलो, असं आव्हाड म्हणाले. ‘सुरुवातीला माझी चाचणी निगेटिव्ह आली होती. त्यामुळे मी परिस्थिती गांभीर्यानं घेतली नाही,’ असं आव्हाड यांनी सांगितलं. ‘त्यानंतर मला ताप आला. माझी कोरोना चाचणी निगेटिव्ह आली असल्यानं ही लक्षणंदेखील दूर होतील, असं मला वाटलं. ती माझी चूक होती. त्याची मोठी किंमत मला मोजावी लागली,’ असं आव्हाड म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
मोठी बातमी : पंतप्रधान मोदी आज 8 वाजता जनतेशी साधणार संवाद, लॉकडाऊनबाबत मोठा निर्णय ?
अशी आहे कोरोनाबाधितांची गेल्या 24 तासातली आकडेवारी, वाचा फक्त एका क्लिकवर !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

