मुंबई : राज्यतील कोरोना काही कमी होईचं नाव घेईना. काल दिवसभरात १२३० नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाल्याने रुग्णांचा आकडा २३ हजार ४०१ इतका झाला आहे. तर, दिवसभरात ५८७ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत तब्बल ४,७८६ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
याबाबत राज्याच्या आरोग्य विभागाने माहिती दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिवसभरात राज्यात ३६ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. यात २३ पुरुष आणि १३ महिलांचा समावेश आहे. या ३६ मृत्यूंपैकी तब्बल १७ जणांचे वय साठहून अधिक होते. १६ जण चाळीस ते साठ या वयोगटातील होते. तर, तीन जण ४० वर्षांखालील आहेत. आज ३६ मृतांपैकी २७ जणांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरूपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.
मृतांमध्ये मुंबईमध्ये २०, सोलापूर शहर ५, पुणे ३, ठाणे २, अमरावती, औरंगाबाद, नांदेड, वर्धा जिल्हा आणि रत्नागिरीमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. याशिवाय उत्तर प्रदेशमधील एकाचा मुंबईत बळी गेला आहे. आतापर्यंत प्रयोगशाळेत पाठविण्यात आलेल्या २,१८,९१४ नमुन्यांपैकी १,९३,४५७ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत तर २३,४०१ जण पॉझिटिव्ह आले आहेत.
दरम्यान 24 तासांमध्ये देशात नव्या ४२१३ रुग्णांची नोंद झाली. काही राज्ये माहिती देण्यास विलंब करीत असल्याने एका दिवसात हा आकडा वाढलेला दिसतो, असे आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव अगरवाल यांनी स्पष्ट केले. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ३१.१५% आहे. आरोग्य सेतू अॅपवरून कुणाचीही खासगी माहिती केंद्राकडे जमवली जात नसल्याचे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले.
महत्त्वाच्या बातम्या
कोरोनाच्या काळात किंमत झाली अवाच्या सवा तरी व्यसनाधीन म्हणतोय मला तंबाखूचा विडा हवा !
अफवांवर विश्वास ठेऊ नका ! केंद्र सरकार कोणाच्याही वेतनात कपात करणार नाही
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

