🕒 1 min read
मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या रडारवर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कुटुंबीय आले आहे. कराड येथे पत्रकार परिषद घेऊन सोमय्या यांनी अलिबाग येथे जाणार असल्याचे जाहीर केले आहे. ‘अलिबाग आणि जरंडेश्वर येथेही उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांनी केलेल्या चुकीच्या व्यवहारांची माहिती घेण्यासाठी जाणार आहे. अलिबाग येथे मुख्यमंत्री ठाकरे यांनी रश्मी ठाकरे यांच्या नावाने घेतलेल्या बेनामी मालमत्तेची चौकशी करण्यासाठी जाणार’ असे सोमय्यांनी म्हटले.
‘ठाकरे कुटुंबाकडे १९ बंगले आहेत. हे बंगले कुठून आले? उद्धव ठाकरे यांनी पत्नीच्या नावे बंगले घेतले आहेत. त्यामुळे सोमवारी अलिबागला जाऊन उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्या नावाने घेतलेल्या बंगल्याची पाहणी करणार आहे, असं सोमय्या यांनी सांगितले.
सोमय्या यांच्या या आरोपावर शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘किरीट सोमय्यांनी चंद्रावर, मंगळावर जाऊन आमच्या लोकांच्या जमिनी शोधाव्यात असा टोला राऊत यांनी लगावला आहे. मुंबई येथे माध्यमांशी संवाद साधताना राऊत यांनी सोमय्यांच्या आरोपाचा समाचार घेतला.
ते म्हणाले, ‘या देशात लोकशाही, व्यक्तीस्वातंत्र्य आहे. महाराष्ट्र पुरोगामी राज्य आहे. असे आरोप याआधीही झाले आहेत. आरोप करणाऱ्यांच्या तोंडाला कोणी टाळं लावू शकत नाही. कोणी केंद्र सरकारच्या सूचनेनुसार आरोप करायचं ठरवलं असेल तर आम्ही काहीच करु शकत नाही. पंतप्रधान मोदी, अमित शाह यांच्यावरही आरोप होतात. आरोप करणे सध्या फॅशन झाली आहे, त्यानुसार त्यांनी आरोप करत राहावे’ असा खोचक टोला राऊत यांनी लगावला.
महत्त्वाच्या बातम्या
- सोमय्यांच्या रडावर आता ठाकरे कुटुंबीय; अलिबागला जाऊन रश्मी ठाकरेंच्या बंगल्यांची पाहणी करणार
- मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून किरीट सोमाय्यांवर होत असलेली कारवाई थांबवायला हवी होती – फडणवीस
- ‘सोमय्या फक्त साधन, खरे मास्टरमाईंड चंद्रकांत पाटीलच’, हसन मुश्रीफांचा आरोप
- चंद्रकांत पाटलांकडून मला भाजपात येण्यासाठी ऑफर; हसन मुश्रीफांचा गौप्यस्फोट
- कुटुंबांवर केलेले आरोप बिनबुडाचे, सोमय्यांच्या सीए पदवीवरच मला शंका-हसन मुश्रीफ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
