Share

सोलापूर सोडणार की अकोला, प्रकाश आंबेडकर म्हणतात…

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे सोलापूर आणि अकोला या दोन मतदारसंघात निवडणूक लढवत आहेत. जर आंबेडकर दोन्ही ठिकाणी विजयी झाले तर कोणती जागा सोडणार यावर सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे या चर्चेला खुद्द प्रकाश आंबेडकर यांनीच पूर्णविराम दिला आहे.

सोलापुरात तिरंगी लढत होत असून अकोल्याठी आंबेडकरांसमोर तगडे आव्हान आहे. जर दोन्ही जागांवर विजय मिळवला, तर ते कोणती जागा सोडणार? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी स्मित हास्य करत आपण आत्ताच प्रतिक्रिया देणार नसल्याचं ते म्हणाले. त्यामुळे निकाल लागल्यानंतर त्यांची भूमिका काय असेल हे पाहन महत्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, यापूर्वी पंतप्रधान होण्यासाठी अनेक नेते इच्छुक असले तरीही लोकसभा निवडणुकीनंतर एच.डी.देवेगौडा हे पंतप्रधान व्हावेत असे मत आंबेडकर यांनी व्यक्त केले. तर शरद पवार यांना पंतप्रधानपदासाठी लायक मानत नाही असं म्हणत पवारांना चिमटा काढला आहे. ममता बॅनर्जी, चंद्राबाबू नायडू आणि केसीआर हे देखील कधीच पंतप्रधान होणार नाहीत, असे भाकीत आंबेडकरांनी केले आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!